मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी; देशातील पहिल्या महिला शिक्षिका, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी; देशातील पहिल्या महिला शिक्षिका, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी

सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी(Death Anniversary) आहे. सावित्रीबाईंबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी जाणून घेऊ.

सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी(Death Anniversary) आहे. सावित्रीबाईंबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी जाणून घेऊ.

सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी(Death Anniversary) आहे. सावित्रीबाईंबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी जाणून घेऊ.

मुंबई 10 मार्च : समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा (Women’s Education) पाया घालणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका (India’s First Female Teacher) म्हणजे सावित्रीबाई फुले (Savitribai Phule). सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी(Death Anniversary) आहे. सावित्रीबाईंबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी या लेखातून जाणून घेऊ.

भारतातील स्त्रीमुक्तीचं प्रतिक असलेल्या सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील (Maharashtra) समाजसुधारणेच्या चळवळीतील (Social Reforms) महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. आपले  पती समाजसुधारक ज्योतिराव फुले (Jyotirao Phule) यांच्यासमवेत त्यांनी देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची (India’s First School for Girls) स्थापना केली.

सावित्रीबाई फुले यांनी जातीयता आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढा दिला. मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळ उभारली. कवयित्री असलेल्या सावित्रीबाईंनी समाजातील विषमता, भेदभाव, जातीय अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधात सातत्यानं आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लढा दिला. महिलांना शिक्षण मिळावं, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळावी, हक्क मिळावा यासाठी सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचा वारसा आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे. सावित्रीबाई यांचे वयाच्या 66 व्या वर्षी बुबोनिक प्लेगमुळे (Bubonic Plague) निधन झालं.

थोर समाज सुधारक,विचारवंत आणि तळमळीच्या कार्यकर्त्या असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही महत्त्वपूर्ण माहिती :

1. वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाई यांचे 13 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झाले.

2. समाजाकडून प्रचंड विरोध होऊनही त्यांनी महिलांच्या शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं. आपल्या पतीच्या सहकार्यानं भारतात मुलींसाठी पहिली शाळा उघडल्यानंतर त्यांनी आणखी 18 शाळा सुरू केल्या.

3.  1848 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत केवळ नऊच विद्यार्थीनी होत्या. सावित्रीबाई त्या मुलींना शिकवत आणि शाळा सोडून जाऊ नये यासाठी काही पैसेही देत. या मुलींनी शिक्षण पूर्ण करावे यासाठी त्या सतत प्रोत्साहन देत.

4.  त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात शेतकरी कुटुंबात झाला.

5. भारतीय समाजात असणाऱ्या विधवा महिलांच्या केशवपनाविरोधात आवाज उठवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

6. 1998 मध्ये भारतीय टपाल खात्यानं (India Post) सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ एक तिकीट प्रकाशित केलं.

7. बलात्कारीत गर्भवती महिलांसाठी त्यांनी एक केंद्र सुरू केलं आणि या महिलांनी आपल्या बाळाला जन्म द्यावा यासाठी त्यांना खंबीर आधार दिला.

8.  सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा,यशवंत यांनी 1897मध्ये पुण्यात पसरलेल्या ब्यूबोनिक प्लेगच्या साथीत लोकांवर उपचार करण्यासाठी एक उपचार केंद्र सुरू केले. तिथं प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई यांनाही या आजारानं गाठलं.

9.  समाजात ‘अस्पृश्य’ समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरातील विहीर खुली केली होती.

10. सावित्रीबाईंनी आपल्या पतीसमवेत सत्यशोधक समाजाची (SatyashodhakSamaj) स्थापना केली. हुंडा न घेता आणि धार्मिक गुरुविना (भटजी) विवाह व्हावेत;विशेषत: आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावं हा त्यामागचा हेतू होता.

First published:

Tags: Bubonic plague, Death anniversary, Maharashtra, Savitribai Phule, Teacher