• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • रिसोड-मालेगाव महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातात दोन दिवसात दोघांनी गमावले प्राण

रिसोड-मालेगाव महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातात दोन दिवसात दोघांनी गमावले प्राण

बुधवारी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान रिसोड येथील शिक्षक प्रदीप आढाव हे आपल्या कारने जात असताना रिसोड-मालेगाव या महामार्गावर बिबखेडाजवळ त्यांची कार पलटी (Car Accident in Washim) होऊन झालेल्या अपघातात आढाव या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:
वाशिम (किशोर गोमाशे), 06 मे : जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून बिबखेड्या नजीक दोन दिवसात दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान रिसोड येथील शिक्षक प्रदीप आढाव हे आपल्या कारने जात असताना रिसोड-मालेगाव या महामार्गावर बिबखेडाजवळ त्यांची कार पलटी (Car Accident in Washim) होऊन झालेल्या अपघातात आढाव या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप आढाव हे आपल्या कारने रिसोड येथून जांब आढाव इथं जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर कार महामार्गालगत असलेल्या शेतात जाऊन पडली होती. सद्यस्थितीत कार पलटी झाल्याचं दिसत असून अपघात घडण्याचे कारण रिसोड पोलीस शोधत आहेत. याच महामार्गावर पळसखेड फाट्यावर मंगळवारी दोन मोटारसायकलींच्या समोरा-समोर झालेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हे वाचा - Bank Holiday: खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद मालेगाव तालुक्यातील (Malegaon) मारसूळ येथील गणेश शामराव निगोते (वय 22) हा रिसोडकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारसायकलस्वाराने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार रस्त्यावर कोसळले. या अपघातात गणेश निगोते याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्यावर अकोला इथं उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. याप्रकरणी मृताचे वडील शामराव निगोते यांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मृत गणेश हा रिसोड येथे उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील दुसरा दुचाकीस्वाराबद्दल माहिती मिळू शकली नाही. या अपघाताचा तपास रिसोड पोलीस करत आहेत. हे वाचा - Coronavirus 2nd Wave: हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा ‘हाय अलर्ट’, नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या रिसोड-मालेगांव या महामार्गावर वाहनांचा वेग वाढल्यानं अपघात घडत असल्याचं दिसत आहे. यासाठी वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून पोलीस आणि परिवहन विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: