कोल्हापूर, 1 सप्टेंबर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोकुळच्या वार्षीक सभेवर भाष्य करण्यात आले आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेन प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी गोकुळच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. रात्रदिवस काबाडकष्ट करुन चांगल्या गुणवत्तेचे दूध बळीराजा ‘गोकुळ'कडे पाठवित असतो. परंतु राजकीय स्वार्थासाठीच याच दुधाच्या गुणवत्तेची बदनामीची चर्चा संघालाच मारक ठरत आहे. गुणवत्तेचे दुध पाठविणाऱ्या बळीराजाचा हा अपमान आहे. अशी जोरदार टीका पाटील यांनी केल्याने शेतकऱ्यांचा पाठींबा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोकुळच्या राजकारणावर भाष्य केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले कि, 'गोकुळ'च्या काखेत कुणी बसायचं यासाठीच्या भांडणामध्ये गोकुळच्या गुणवत्तेला बदनाम करु नका. बल्क कुलर सेंटरवर सुरु असणाऱ्या कारभारामुळेही बदनामी वाढत आहे, गोकुळ ही जिल्ह्याची शिखरसंस्था, आर्थिक धमनी आहे. संचालकांना महिन्यापोटी कितीचे पाकीट दिले जाते? ठरावधारकांना किती दिले? याची माहिती आम्हाला आहे. असा आरोप स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
हे ही वाचा : कृषिमंत्री सत्तार शेतकऱ्याच्या घरी झोपले, अन् 6 ते 7 किमी अंतरावरच शेतकऱ्याने आयुष्य संपवले!
गोकुळच्या कारभाराबद्दल तुम्ही ईडी, सीबीआयसह अन्य चौकशींचे सत्र लावा. पण राजकीय स्वार्थासाठी सामान्यांच्या घरात नांदणाऱ्या गोकुळची नाहक बदनामी करु नका. सभासदवर्ग गुणवत्तेच्या दुधाचा पुरवठा संघाकडे करत असतो. परंतु, या दुधाच्या गुणवत्तेबाबत होणाऱ्या नाहक चर्चा संघाला मारक ठरत आहे. शिवाय गुणवत्तेचा दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या अपमानास्पद आहेत. पशुखाद्य विभाग तोट्यात असताना खाद्याची वारंवार दरवाढ का केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
हे ही वाचा : काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातून? चर्चेदरम्यान नाना पटोलेंचा मोठा खुलासा, थेट नावच सांगितलं
अन्य राज्यामध्ये दुधाचे ब्रॅण्ड आहेत... त्याप्रमाणेच गोकुळ राज्याचा ब्रॅण्ड व्हावा. गोकुळचे दैनंदिन १४ लाख लिटर दूध कलेक्शन होते. यामधील ८ लाख लिटर मुंबईत, ४ लाख लिटर पुणे तर २ लाख लिटर दुधाची अन्यत्र विक्री होते. राज्यात अपेक्षित दुधाचे उत्पादन होत नसल्याने परराज्यातील दूध विक्रीसाठी राज्यात येत आहे. त्यामुळे दुधवाढीसाठी अधिक भर द्यावा. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, भीमराव गोनुगडे, रमाकांत तोडकर, मारुती पाटील, नामदेवराव गोंगाणे आदी उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Raju Shetti (Politician), Swabhimani shetkari sanghatna