जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, शस्त्र सापडल्याची माहिती

BREAKING : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, शस्त्र सापडल्याची माहिती

BREAKING : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, शस्त्र सापडल्याची माहिती

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये शस्त्र सापडल्याची माहिती समोर

  • -MIN READ
  • Last Updated :

रायगड, 18 ऑगस्ट : रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी धाव घेतली. संशयास्पद बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. डी वाय एस पी. तहसीलदार एसआरटी टीम अध्यक्ष सुहेब हमदुले आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाल आहे. ही बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बोटीची पाहणी केली जात आहे.

जाहिरात

ही बोट किनाऱ्यावर आणण्याात आली आहे. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. या बोटीमध्ये एक पेटी आढळली होती. पेटी उघडली असता त्यामुळे या 3 एके 47 रायफल्स सापडल्या आहेत. ही बेवारस कुणाची आहे, कुठून आली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी धाव घेतली. संशयास्पद बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. डी वाय एस पी. तहसीलदार एसआरटी टीम अध्यक्ष सुहेब हमदुले आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाल आहे. ही बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बोटीची पाहणी केली जात आहे. रायगडच्या आमदार आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर आणि भरडपूरमध्ये दोन बोटी सापडल्या आहेत. या बोटीमध्ये काही कागदपत्र सापडली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबद्दल विधानसभेत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत आहे. पण राज्याचे एटीएस पथक आणि केंद्राची एनआयए संस्थेनंही याचा तपास करावा, अशी माहिती तटकरे यांनी दिली. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली आहे. रायगड जिल्ह्यांच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या हत्यांरासहीत बोटीची माहिती देण्यात मुख्यमंत्र्यांना देण्या आली आहे. माहिती मिळताच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री घटनेची माहिती विधिमंडळात देणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात