मुंबई, 27 फेब्रुवारी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आपल्या भाषणातून शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत असतात. जितक्या प्रखरपणे त्या आपली मतं मांडतात पण त्यापलीकडे जाऊन अंधारे या आपल्या कुटुंबासाठी तितक्याच संवेदनशील आणि भावुक असतात. लेकीच्या वाढदिवसाला जाता न आल्यामुळे अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेनेचे नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवसैनिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्या शेकडो किलोमिटरचा प्रवास करत आहे.
या प्रवासात सुषमा अंधारे यांना मात्र घराची वाट मुकावी लागली आहे. सुषमा अंधारे यांची कन्या कब्बूचा वाढदिवस आहे. पण दौऱ्यावर असल्यामुळे अंधारे यांना लेकीच्या वाढदिवसाला जाता आलं नाही. सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाल्या? ‘शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरू आहेत. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय. पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय. दीड दोन तासांपूर्वीचा कणखर लढावू बाणा गळून पडलाय. समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघून “पराधीन जगती पुत्र मानवाचा " या ओळींची यथार्थता अनुभवतेय.. 12 वाजलेत…. लेकीचा वाढदिवस आहे.. आत्ता या क्षणाला मी तिच्या सोबत असायला हवं अर्थात नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कूठे आहे म्हणा? (इंदुरीकर महाराजांचं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना खास आवाहन, म्हणाले… VIDEO) पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा! आत्ता जी मनाची घालमेल होतेय ती कदाचीत फक्त Rupali Patil Thombare ही मैत्रिणच समजू शकेल..! कारण 11 फेब्रुवारीला तिच्या विरूचा वाढदिवस होता. कब्बुपेक्षा फक्त 16 दिवसांनी मोठा आहे तो.. अन् त्याच्या वाढदिवसाला ईच्छा असूनही कामामुळे रूपाली पोचू शकत नव्हती. वरुन कितीही खमकेपणा दाखवला तरी त्यादिवशी फ्लाईटमध्ये तिचा रडवेला चेहरा अन् आरक्त डोळे तिच्यातल्या व्याकूळ आईचं काळीज डोकावत होतं. (चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “नितीन गडकरींची भाजपमध्ये घुसमट…”) असो भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. याक्षणी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे. लेकीचा वाढदिवस शिवसैनिक मामा शहरप्रमूख Anand Goyal Gajanan Tharkude - गजानन थरकुडे Nilesh Jathar Akshay Sagar Malkar हे सगळे आहेतच त्यामुळे फिकर नॉट…