जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / New Ncp President : राष्ट्रवादीत घडणार मोठी घडामोड; पहिल्यांदाच होणार महत्त्वाचा निर्णय

New Ncp President : राष्ट्रवादीत घडणार मोठी घडामोड; पहिल्यांदाच होणार महत्त्वाचा निर्णय

अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग

अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 मे: राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड तुर्तास न करता कार्याध्यक्षाची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीच्या पक्ष घटनेत कार्याध्यक्षपदाची तरदूत नाहीये. त्यामुळे हा विचार मागे पडला आहे. दुसरीकडे शरद पवार हे आपला निर्णय बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाला पसंती  दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्या नावाला पक्षातील विरिष्ठ नेत्यांनी पसंती दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे याच आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होण्याची शक्यता आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी चार नावांची चर्चा आहे. ज्यामध्ये सर्वात आघाडीवर सुप्रिया सुळे यांचं नाव आहे, त्यानंतर छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची देखील चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट; बैठकीतून महत्त्वाची बातमी राज्याची धुरा अजित पवारांकडे?  दरम्यान दुसरीकडे राज्याची धुरा अजित पवार यांच्या हाती सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे वरीष्ठ नेत्यांची राष्ट्रीय पातळीवरील कोअर कमिटी करुन त्यात अजित पवारांसह अनेक वरीष्ठ नेत्यांचा समावेश करण्यावर ही प्राथमिक चर्चा झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात