महाराष्ट्राचा महासंग्राम : श्रीवर्धनमध्ये अवधूत तटकरेंच्या सेनाप्रवेशामुळे समीकरणं बदलली

महाराष्ट्राचा महासंग्राम : श्रीवर्धनमध्ये अवधूत तटकरेंच्या सेनाप्रवेशामुळे समीकरणं बदलली

सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे, विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांच्यातला सत्तासंघर्ष टोकाला गेला आणि अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे इथली सत्तेची समीकरणं बदलली आहेत.

  • Share this:

रायगड, 19 सप्टेंबर : रायगड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं राजकीय नाव म्हणजे सुनील तटकरे. मात्र सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे, विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांच्यातला सत्तासंघर्ष टोकाला गेला आणि अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे इथली सत्तेची समीकरणं बदलली आहेत.

लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन आणि अलिबाग तालुक्याचं मतदान निर्णायक ठरलं. त्यामुळे सुनील तटकरेंची मुलगी आणि संभाव्य उमेदवार अदिती तटकरेंना याचा फायदा होऊ शकतो. त्या सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. मात्र अदिती तटकरेंची लढत विद्यमान आमदार अवधूत तटकरेंशी असल्याने ही लढत नक्कीच सोपी नाही.

खरंतर श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2009 साली सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 2014 ला अवधूत तटकरे निवडून आले. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. मात्र अवधूत तटकरेंच्या शिवसेना प्रवेशानंतर ही समीकरणं बदलू शकतात. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही.

निवडणुकांच्या धामधुमीत सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती पण स्वत: तटकरेंनीच याचा खुलासा केला.आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहोत,असं ते म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून विजयी झाले आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान

Loading...

अवधूत तटकरे (राष्ट्रवादी) - 61,038

रवींद्र मुंढे (शिवसेना) - 60,961

कृष्णा कोनबाक (भाजप) - 11,215

================================================================================================

VIDEO: मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...