जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'अयोध्येत सुसाईड बॉम्बर' PFI ची उघड धमकी; मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे सुद्धा टार्गेटवर!

'अयोध्येत सुसाईड बॉम्बर' PFI ची उघड धमकी; मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे सुद्धा टार्गेटवर!

आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार ...

आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार ...

आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार …

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर, 08 ऑक्टोबर : देशभरामध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर ईडी आणि एनआयकडून छापेमारी सत्र अजूनही सुरूच आहे. मात्र, सोलापूरमध्ये PFI च्या कार्यकर्त्याने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एवढंच नाहीतर या पत्रामध्ये अयोध्या, मथुरेमध्ये आमचे सुसाईड बॉम्बर असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाहीतर राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार सुद्धा टार्गेटवर असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकी देण्यात आली आहे. मोहम्मद शफी बिराजदार नामक सोलापुरातील एका व्यक्तीने हस्तलिखित पत्र पाठवत धमकी दिली. धमकी पत्रामध्ये म्हटलंय की, तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे. त्याचबरोबर अयोध्या, काशी, मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर एका दिवसात उडवून दहशत माजवतील. आम्ही मुसलमान आहोत, अशी धमकीही या पत्रात दिली आहे. (‘पुढे सुद्धा अशी कीड तात्काळ समूळ नष्ट करायला हवी’, राज ठाकरेंकडून अमित शाहांचं अभिनंदन) याशिवाय आता आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे, असा इशाराही या पत्रात दिला आहे. याशिवाय पत्रात म्हटले आहे की, तुम्ही PFI वर बंदी आणून चुकीचे काम केले. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. यापुर्वी सीमीवरदेखील बंदी आणली होती त्याचे काय झाले ? फेल गेले. तुम्ही PFI ला लाख वेळा बंदी घाला तरीही आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, असंही या पत्रात म्हटलंय. (Dasara Melava : हे भोळे बनून येतात पण…, PFI च्या कारवाईवर मोहन भागवतांचं मोठं विधान) तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमचे मुले गप्प बसणार नाही. घराघरात कसाब, अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील हे गोष्ट लक्षात घ्या, असा इशाराही दिला आहे. दरम्यान या धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात