मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ABVP चे कार्यकर्त्ये आक्रमक, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला

ABVP चे कार्यकर्त्ये आक्रमक, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला

जालना, 27 ऑगस्ट: धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP)कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं. हेही वाचा......तर राज्यात शाळा सुरू होतील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा फी परत करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या धुळे येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. तसेच साध्या वेशातील एका पोलिसांने एका कार्यकर्त्याला बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ जालन्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गांधी चमन येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळाचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. काय आहे प्रकरण? विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( ABVP) कार्यकर्त्यांनी बुधवारी धुळ्यात आंदोलन केलं. यादरम्यान विद्यार्थ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली असता पोलिसांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या देखत अमानुष लाठीचार्ज केला. गेल्या पाच महिन्यांत कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच प्रवेश फी 30 टक्के कमी घ्यावी, परीक्षा शुल्क परत करावे, अशीही मागणी करण्यात आली. या दरम्यान धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अभाविपने अडवला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थी कार्यकर्त्यांवर अमानूष लाठीचार्ज केला. अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी केला आहे. हेही वाचा...महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी, केली 35 कोटींची डिमांड! भाजप आमदाराचं ट्वीट... आता भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देखील ट्वीट केले असून, मारहाण करणाऱ्या धुळे पोलिसांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. “धुळे पोलीसांच्या गुंडागर्दी चा निषेध करावा तितका कमीच आहे. पालकमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली नाही म्हणून विद्यार्थ्यानी पालकमंत्र्यांची गाडी अडवली यावर पोलीसांनी आशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण केली.पोलीसावर कारवाई व्हावी,' असे ट्वीट आमदार राम सातपुते यांनी केलं आहे.
First published:

Tags: Abvp

पुढील बातम्या