मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज आढावा बैठक

राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज आढावा बैठक

राज्यातलं सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) बैठक घेणार आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 28 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे एकच खळबळ माजली आहे. जगातले सर्वच देश सतर्क झालेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही सरकारनं (State Government) नवीन नियमावली जारी केली आहे. राज्यातलं सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) बैठक घेणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतून सुरु असणाऱ्या विमान सेवेवर बंद घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर तसंच नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील. या बैठकीस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित असतील.

हेही वाचा-  Corona Rules:...नाहीतर भरावा लागेल 10 हजारपर्यंत दंड, कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली

 त्यातच येत्या 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरु होत असलेल्या भारत- न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर 50 टक्केच प्रेक्षक क्षमता ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली

राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.राज्यात कोविड-19 या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य सरकारने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.

हेही वाचा-  'पोरासाठी बाप कधीही तयार असतो', जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात निधीवरुन जुगलबंदी

 राज्य सरकार तसंच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसंच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Rajesh tope, Uddhav Thackeray (Politician)