जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

मोठी बातमी! पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार?

पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार?

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : मोठी बातमी समोर येत आहे. अखेर रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं विलंब झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पुढील आठवडयात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावे?  भरत गोगवले,  संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, बच्चू कडू, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील शिवसेनेच्या या आमदारांना मंत्रिपद मिळण्यची शक्यता आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना देखील वेग आला आहे. केंद्रात देखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्री आशी दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राज्य मंत्रिपदासाठी खासदार प्रतापराव जाधव व भावना गवळी यांची नाव चर्चेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , shiv sena
  • First Published :
जाहिरात
जाहिरात