मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पालघरमध्ये दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात; 50 प्रवासी जखमी, अपघाताचा थरारक VIDEO आला समोर

पालघरमध्ये दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात; 50 प्रवासी जखमी, अपघाताचा थरारक VIDEO आला समोर

ST Bus Accident LIVE VIDEO: पालघर जिल्ह्यात दोन एसटी बसेसचा अपघात झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

ST Bus Accident LIVE VIDEO: पालघर जिल्ह्यात दोन एसटी बसेसचा अपघात झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

ST Bus Accident LIVE VIDEO: पालघर जिल्ह्यात दोन एसटी बसेसचा अपघात झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

विजय राऊत, प्रतिनिधी

पालघर, 10 सप्टेंबर : विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील जवळ दोन एसटी बसेसचा अपघात (ST bus accident) झाला आहे. डहाणू - ठाणे (Dahanu - Thane ST bus) आणि वाडा-जव्हार बसचा (Wada - Jawhar ST Bus) आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस अक्षरश: चिरली गेली आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. (ST bus accident caught in CCTV)

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी. दोन्ही बसमधील 50 प्रवासी किरकोळ तसेच काही गंभीर जख्मी झाले आहेत. आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा तसेच वाड्यावरून येणारी जव्हार-वाडा बस कोकणी पाडा येथील राईसमिल जवळ समोरासमोर एकमेकांना धडकल्या.

हा अपघात घटनास्थळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ या सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला असून अपघात नेमका कसा झाला हे व्हिडीओत दिसत आहे.

पाच दिवसांपूर्वी मुंबई - दापोली एसटीला रत्नागिरीतील शेनाळे घाटात अपघात

या अपघातात दोन्ही बस मधील जवळ-जवळ 50 प्रवासी किरकोळ जख्मी झाल्याचे या बसमधील प्रवाशानी सांगितले. या वेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना तातडीने वाडा, विक्रमगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

First published:

Tags: St bus, St bus accident