शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी, 5 सप्टेंबर : मुंबई - दापोली एसटी बसला (Mumbai - Dapoli ST bus accident) रत्नागिरीत अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेनाळे घाटात एसटी बसला अपघात (ST Bus accident in Shenale Ghat Ratnagiri) झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत. (ST bus accident in Ratnagiri Maharashtra)
जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा पंचनामा चे काम सुरू असून दापोली आगार व्यवस्थापक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
मुंबई - दापोली या एसटी बसमधून एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. चालक वाहक जखमी काही प्रवाशांवर ती प्रथम उपचार करून सोडून देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या बसमधील कोणीही प्रवासी गंभीर जखमी नसल्याचे दापोली आगाराकडून सांगण्यात आले आहे.
हा अपघात पहाटे पाचच्या दरम्यान झाला आहे. परंतु हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलची माहिती कळू शकले नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri, St bus accident