यवतमाळ, 27 मार्च : यवतमाळ येथे धावत्या एसटी बसने अचानक पेट (ST Bus caught fire in Yavatmal) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिळोना-फोपाळी घाटात (Shilona Fopali Ghat) ही घटना घडली आहे. ही एसटी बस पुसद आगाराची (Pusad aagar ST bus) असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पुसद आगाराची ही बस नांदेड करिता जात असताना बसने अचानक पेट घेतला. (Live video of running ST bus caught fire at Shilona fopali ghat Yavatmal) मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एम.एच 40- 6170 ही पुसद आगाराची बस पुसदवरून नांदेड करीता निघाली होती. दरम्यान पोफाळीच्या शिळोणा घाटात अचानक बसच्या समोरच्या भागाला आग लागली. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे वाहनाचा समोरचा भाग पूर्णतः जाळला आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहतूक मोठ्या प्रमाणत विस्कळित झाली.
— News18Lokmat (@News18lokmat) March 27, 2022
एसटी बसने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि त्यानंतर गाडीतून सर्व प्रवासी, चालक, वाहक बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या घटनेत एसटी बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पालघरमध्ये भीषण अपघात सप्टेंबर महिन्यात पालघर जिल्ह्यात दोन एसटी बसेसचा भीषण अपघात झाला होता. विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील जवळ दोन एसटी बसेसचा अपघात (ST bus accident) झाला होता. डहाणू - ठाणे (Dahanu - Thane ST bus) आणि वाडा-जव्हार बसचा (10 सप्टेंबर 2021) सकाळी 9 वाजताच्या सुमारास समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस अक्षरश: चिरली गेली होती. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी. दोन्ही बसमधील 50 प्रवासी किरकोळ तसेच काही गंभीर जख्मी झाले होते. सकाळच्या सुमारास विक्रमगड वरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा तसेच वाड्यावरून येणारी जव्हार-वाडा बस कोकणी पाडा येथील राईसमिल जवळ समोरासमोर एकमेकांना धडकल्या.