मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : पाडव्याच्या दिवशी बस-बोलेरोचा भीषण अपघात; दोन तरुणी जागीच ठार तर 15 जखमी

Video : पाडव्याच्या दिवशी बस-बोलेरोचा भीषण अपघात; दोन तरुणी जागीच ठार तर 15 जखमी

पाडव्याच्या दिवशी बस-बोलेरोचा भीषण अपघात

पाडव्याच्या दिवशी बस-बोलेरोचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यात बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

यवतमाळ, 22 मार्च : सरकार आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना करुनही अपघात कमी होताना दिसत नाही. भारतात अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज सणासुदीच्या वेळीच भीषण अपघात झाला आहे. भरगाव वेगात असलेल्या एसटी महामंडळाची बस आणि मालवाहू बोलोरो वाहनाची समोरासमोर धडक झाली. या घटनेत 2 मुली ठार झाल्या असून 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

ही घटना यवतमाळ दारव्हा मार्गावरील कामटवाडा गावाजवळ घडली. पायल गणेश किरसान आणि पल्लवी विनोद भरडीकर असे मृत मुलींची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की बसचा उजवा भाग पूर्णपणे चिरला गेला आहे. या अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा प्रवासी जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना यवतमाळच्या शासकिय  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

वाचा - 7 वर्षात जाणार 80 लाख नोकऱ्या? भयानक उष्णता अन् नोकऱ्या जाण्याचा काय आहे संबंध?

राज्यात अपघाताचं प्रमाण वाढलं

मागील पाच वर्षांचा विचार केला तर राज्यात 63 हजार 475 नागरिकांनी जीव गमावले. त्यामुळे राज्यातील महामार्ग हे यमाचे महामार्ग बनले आहे. कोंढाळी- नागपूर हा अवघ्या 50 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग हा मागच्या 20 वर्षांपासून तयार होत आहे. आटलांटा कंपनीकडे याचे कंत्राट आहे. मात्र आज 20 वर्षा नंतर ही आजही हा राष्ट्रीय महामार्ग अर्धवट अवस्थेतच आहे. त्यामुळे या रस्त्याची चुकीची डिझाईन व कंत्राटदाराने ठेवलेले रस्त्याचे अर्धवट काम हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

राज्यातील अपघाताचे आकडे हे पायाखालची वाळू सरकारने आहे. 2021 या वर्षात राज्यात 13 हजार 446 नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला. 2020 च्या तुलनेने 2021 मध्ये अपघात झालेल्या मृत्यूच्या संख्येत 18 टक्क्याने वाढ झाली. मागच्या पाच वर्षांचा विचार करायचा झाला तर राज्यात 63 हजार 475 नागरिकांनी जीव गमावले. अपघातामुळे फक्त त्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही तर मृत व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते.

First published:
top videos

    Tags: Accident, Yawatmal