गडचिरोली, 20 एप्रिल : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) जवान माओवाद्यांच्या (maoist) विरोधात लढत असले तरी अति दुर्गम भागातल्या आदिवासींना वेळेवर जवान कशा पद्धतीने मदत करतात यातून त्यांची संवेदनशीलता दाखवणारी घटना समोर आली. दंतेवाडा या माओवाद प्रभात जिल्ह्यात अभियानात तैनात असलेल्या जवानाने चक्क एका गर्भवती महिलेला खाटेवर रुग्णालयापर्यंत पोहोचवले. त्यामुळे वेळेवर त्या आदिवासी महिलेची प्रसूती होऊन तिचा आणि बाळाचा जीव वाचला. माओवाद्यांकडून रेवाली दरम्यानचा रस्त्याला कापण्यात आला होता. त्यामुळे वाहन आत या भागात जाऊ शकत नव्हती. तेथील गर्भवती महिला कुर्म नंदे हिला प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर तिचा पती देवाने रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र रस्ता नसल्याने ॲम्बुलन्स गावापर्यंत येऊ शकली नाही.
अखेर तिला खाटेवर टाकून खांद्यावर घेऊन कुटुंबीय रुग्णालयाकडे रवाना झाले. त्याचवेळी अभियानावर असलेल्या जवानांनी हे चित्र पाहून मदतीसाठी धावून आला. त्या महिलेच्या खाटेला आपल्या खांद्यावर घेऊन मुख्य मार्गावर नेऊन आपल्या वाहनात बसवून आरोग्य केंद्रापर्यंत नेलं. तिथे त्या महिलेची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. ( जॉब सोडण्याचा विचार करताय? मग नोटीस पिरेडवर असताना काय करावं आणि करू नये; वाचा ) माओवादीग्रस्त भागात जीवाची बाजी लावून जवान आपलं काम चोख पार पाडत असतात. आज एका गर्भवती महिलेसाठी जवान मदतीला धावून आल्याचे पाहून गावकरीही भारावून गेले होते. बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जवानांचे आभार मानले.