अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 3 मार्च : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्रातील नामवंत तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा “सर-सन्मान” हा पुरस्कार देऊन सोलापूरमध्ये गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात दरवर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्राबरोबरच ग्रामविकास साहित्य ,लेखन ,सामाजिक ,संशोधन आणि ग्रास रूट इनोव्हेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत असतो. कुणाचा होणार सन्मान? यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये सोलापुरातील बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापक संचालक डॉक्टर राम रेड्डी यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यात येणार आहे. राम रेड्डी हे नाव सोलापूरकरांना नवीन नाही. कोरोना काळात रेमडेसीवर हे इंजेक्शन देवदूताप्रमाणे प्राण वाचवणारे ठरले होते. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या अमिनो नावाचा मॉलिक्युल हा राम रेड्डी यांच्या बालाजी अमाईन्स या केमिकल कंपनीने तयार केला होता. देशभरात आणि जगभरात याच मॉलिक्युलने आपली कमाल दाखवत कोरोना सारख्या भयावह असणाऱ्या रोगावर इलाज म्हणून उपयुक्त ठरला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंड देऊन अहिल्यादेवी होळकर प्रसूतीग्रृह हे नूतनीकरण करून अद्यावत सेवा सुविधा महापालिकेला आणि नागरिकांना प्रदान केले आहेत. राम रेड्डी यांच्यासोबतच आणखी सहा जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. विशेष म्हणजे पुरस्काराचे कोणतीही शिफारस दखलपात्र ठरत नाही. हा पुरस्कार कार्यक्रम सोहळा 4 मार्च रोजी सकाळी दहा वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव सोलापूर येथे होणार आहे. सोलापूरकरांनो, चुकवू नका ही संधी, 800 जागांसाठी होणार भरती! लगेच करा अर्ज ‘समाजात नवी चेतना निर्माण व्हावी आणि जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांचे सोलापूरकरांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने या पुरस्काराचे वितरण आम्ही सर फाउंडेशन तर्फे करत असतो. देशभरातील प्रयोगशील शिक्षक या कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी होणार असून त्यांनी केलेले नवनवीन प्रयोग हे उपयुक्त ठरत आहेत. पुरस्कार वितरण आणि इतर कार्यक्रम असा दोन दिवसीय मोठा कार्यक्रम सोलापूरकरांसाठी आम्ही आयोजन केले आहे,’ अशी माहिती सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे यांनी दिली आहे. एका हाताला सलाईन, दुसऱ्या हातात पेन; करमाळ्यातल्या तरुणीनं जिद्दीनं दिला बारावीचा पेपर हे आहेत पुरस्काराचे मानकरी 1) डी. राम रेड्डी (व्यवस्थापकीय संचालक बालाजी अमाईन्स लिमिटेड) 2) शेखर गायकवाड (IAS) (साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे) 3) डॉ. कलीमोद्दीन शेख (संचालक, महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा संस्था, औरंगाबाद) 4) डॉ. श्री. दीपक माळी (प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) 5) डॉ. किरण धांडे (प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा, पुणे) 6) श्री. प्रदीप मोरे (माजी शिक्षण उपसंचालक पुणे) 7) सर सन्मान गुरू वंदना श्री. दत्तात्रय वारे (ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक, वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेचे शिल्पकार पुणे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.