सोलापूर 8 फेब्रुवारी : सोलापूर कर्नाटक रेल्वेने तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दक्षिण विभागातील रेल्वे रुळांच्या आणि तांत्रिक प्रणालींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ट्राफिक ब्लॉक चालवण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचा मार्ग परिवर्तन करण्यात आला आहे. तरी प्रवाश्यांनी या संदर्भात अपडेट राहून आपला प्रवास सुनिश्चित करावा, असं आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दक्षिण विभागातील हुबळी विभागाच्या गुलेदगुद्दा रोड ते बादामी सेक्शन दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ट्राफिक ब्लॉक चालवण्यात येणार असून हा सोमवार पर्यंत असणार आहे. यामुळे दुहेरी मार्गाच्या कामा करिता गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचा मार्ग परिवर्तन करण्यात आला आहे.
Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर मार्गावरील 'वंदे भारत'ला मोठा अडथळा, पाहा काय आहे कारण
रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणॆ
सोलापूर - हुबळी एक्सप्रेस 15 तारखेपर्यंत रद्द
हुबळी - सोलापूर एक्सप्रेस 15 तारखेपर्यंत रद्द.
सोलापूर - गदग एक्सप्रेस 15 तारखेपर्यंत रद्द.
गदग - सोलापूर 15 तारखेपर्यंत एक्सप्रेस रद्द.
आशिंक रद्द गाड्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्सप्रेस बांका घाट स्थानकापर्यंत 15 तारखेपर्यंत धावेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस बांका घाट स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर 16 तारखेपर्यंत सुटेल.
मार्ग परिवर्तन गाडी
साई नगर शिर्डी - म्हैसूर एक्सप्रेस ही व्हाया होटगी कलबुर्गी, वाडी , रायचूर, गुंतकल आणि बेल्लारी जंक्शन मार्गे 14 तारखेपर्यंत धावेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.