पंढरपूर, 29 मार्च : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता केलेल्या आणखी एका वक्तव्याची चर्चा होत आहे. तानाजी सावंत यांनी स्वत:चं कौतुक करताना थेट अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याशी तुलना केलीय. त्यांनी म्हटलं की, पंढरपूरच्या मैदानात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीं , हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण आडवाणी यांच्या सांभाना मैदान भरले नाही. पण ते मैदान सावंत बंधूनी किमया करून भरून दाखवले.
सोलापूरच्या पालकमंत्री पदाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री पद आपल्यास दिले. मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला हवे होते. अजून माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते विचार करतील असे तानाजी सावंत यांनी म्हटलं.
तानाजी सावंत म्हणाले की, याच मातीतील माणूस पालकमंत्री म्हूणन दिला तर अश्या अनेक वास्तू पंढरी नगरीं मध्ये उभारू शकतील. सोलापूरचा पालकमंत्री असतो तर सावंत काय निधी देऊ शकतात हे सोलापूरकरांनी पाहिले असते पण आता जर निधी मिळत नसेल तर माझ्या भैरवनाथ शुगर मधून विकासाला पैसे देऊ असं सावंत म्हणाले.
आरोग्य खातं पसंत नव्हतं
आरोग्य खातं मला पसंत नव्हतं असं सांगत तानाजी सावंत यांनी आपली नाराजी उघड केली. ते म्हणाले की, राज्यातील सत्ता बदलानंतर आपणास आरोग्य खात दिलं. मात्र आपल्याला आरोग्य खातं पसंत नव्हतं. मी नाराज होतो तरीही सेवाभावी वृत्तीने काम करत असून आता खाते आवडत आहे.
छत्रपती संभाजीराजेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवर धाराशिव येथील आरोग्य केंद्राची दुरावस्था दाखवली होती. त्याबद्दल बोलताना आरोग्य मंत्री सावंत यांनी म्हटलं की, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहा. लाईव्ह दाखवा, त्या केंद्राची अवस्था कशामुळे झाली होती ते समजून घ्या. त्याठिकाणी एका ऑपरेशन थिएटरचे काम सुरु होते. मात्र 24 तासात ते सर्व व्यवस्थित केले आहे. याबद्दल मी छत्रपतीना धन्यवाद देईल. मला अश्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या तर त्याठिकाणी प्रगती होईल त्यामुळे त्याबद्दल काही वाईट वाटायचं कारण नाही अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur