प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 18 मे : अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील तरुणाने अंगाला हळद लागण्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. 21 मे रोजी श्रीकांत बिराजदार याचा विवाह होणार होता. विवाहाच्या तीन दिवस अगोदरच अज्ञात कारणातून त्याने आत्महत्या केली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, शुभविवाह प्रसंगी अशी घटना घडल्या दोन्ही कुटुंबावर शोककळ पसरली आहे. अक्कलकोट तालुक्यातील एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वत:च जीवन संपवलं. श्रीकांत उर्फ विद्या इरणा बिराजदार (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ही आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत हा मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत अक्कलकोट कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याचं लग्नही ठरलं होतं. येत्या रविवारी 21 मे रोजी त्याचा विवाह होणार होता. पण अचानकपणे त्याने हे टोकालचं पाऊल उचललं. श्रीकांत याने स्वतःच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाच्या फांद्याला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. तो सरपंच शोभा बिराजदार यांचं मुलगा होता. वाचा - नवरा सारखा भांडायचा, पत्नीने 2 लाखांची सुपारी दिली आणि कायमचा आवाज केला ‘बंद’! दोन दिवसांवर विवाह श्रीकांत बिराजदार या तरुणाचा येत्या रविवारी म्हणजे 21 मे रोजी विवाह होणार होता. पण अचानकपणे त्याने हे टोकालचं पाऊल उचललं. त्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरु केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.