सोलापूर, 26 फेब्रुवारी : शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक देणे अडत व्यापाऱ्याला महागात पडले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. कांदा व्यापाऱ्याचा सूर्या ट्रेडिंगचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी दहा पोती कांदा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केला होता. त्या मोबदल्यात एक रुपया प्रति किलोप्रमाणे 512 रुपये रक्कम झाली, मात्र हमाली, तोलाई इत्यादी आकारणीनंतर केवळ दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले होते. याबाबतची पावती सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाली आहे.
दरम्यान दोन रुपयांचे चेक अडत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिले होते. यासंदर्भात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. अखेर त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे.
'आयुष्य संपवू द्या', कांद्याने रडवलेल्या हतबल शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
काय आहे प्रकरण ?
शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना कांदा मात्र रडवताना दिसत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दहा पोती कांदा अवघ्या 512 रुपयांना विकला गेला. सर्व खर्च वजा जाऊन 2.49 पैशाचा चेक शेतकऱ्याच्या हातात ठेवण्यात आला.
पंधरा दिवसानंतर चेकची रक्कम मिळेल असे त्या व्यापाऱ्याने सांगितले. याबाबत राजेंद्र चव्हाण यांनी आपली व्यथा मांडली होती. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयातून संताप व्यक्त केला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदाची आवक मोठी आहे. राजेंद्र चव्हाण यांनी 512 किलो कांदा बाजार समिती विकण्यासाठी आणला होता. 10 पोती यांनी आपला कांदा सोलापूर कांदा व्यापाऱ्याला अवघ्या 512 रुपयाला विकला. कांदा हा 1 रुपये दरांप्रमाणे 512 रुपये झाले.
हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल वजा करुन 509.74 रुपये कापून घेण्यात आले. त्यातून राहिलेली 2.49 रुपयांची रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याला केवळ 2.49 रुपयांचा चेक देण्यात आला.
व्यापाऱ्याने शेतकऱ्याला 2.49 रुपयांसाठीचा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेक 8 मार्चचा दिला आहे. यातून शेतकऱ्यांनी बँकेच्या हप्ते, शेतीतील खर्च कसा भागवायचा हा प्रश्नच उभा आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या भावना व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Onion, Priceonion, Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news, Solapur South s13a251