विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 25 फेब्रुवारी : आमच्या मालाला हमीभाव द्या,म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी मागणी करत आहे.मात्र अद्यापही त्या मागणीवर ना राज्य सरकारने विचार केला आहे. ना केंद्र सरकारने, त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे, सध्या कांद्याचे भाव कोसळले आहेत. अवघ्या 2 ते 3 रुपये किलोने कांद्याची विक्री होती आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिकवण्यासाठी झालेला खर्च देखील भरून निघत नसल्यामुळे करायचं काय ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतोय. राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण याला अवलंबून असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. नाशिक जिल्ह्यात सरासरी कांद्याचं चांगलं उत्पादन होतंय, लासलगाव आणि पिंपळगाव या दोन मोठ्या बाजारपेठा नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांद्याची आवक होत असते.सध्याच्या घडीला लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्याला भाव मिळत नाही. विशेष म्हणजे, हा लाल कांदा साठवणूक करून ठेवू शकत नाही. अवघ्या पंधरा ते वीस दिवसात या कांद्याचे नुकसान होतंय. त्यामुळे शेतकऱ्याला अगदी कवडीमोल भावामध्ये हा कांदा विकावा लागत आहे. ‘आयुष्य संपवू द्या’, कांद्याने रडवलेल्या हतबल शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी काय आहे कारण? कांद्याची निर्यात न होणं हे भाव पडण्यामागचं मुख्य कारण आहे. यापूर्वी इतर राज्यांमध्ये देखील महाराष्ट्रातून कांद्याची निर्यात होत होती, पण सध्या अनेक राज्यांमध्ये स्थानिक कांद्याची आवक वाढली आहे. आता इतर राज्य जास्त प्रमाणात कांद्याची आयात करत नाहीत. दुसरं कारण म्हणजे इतर देशांमध्ये कांद्याची निर्यात सध्या होत नाही. त्या देशांमध्ये स्थानिक पातळीवर कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाव कोसळले असल्याची प्रतिक्रिया व्यापारी हिरामण परदेशी यांनी दिली. मालाला हमीभाव द्या शेतकऱ्यांची ही फक्त यावर्षीची परिस्थिती नाही. दरवर्षी शेतकऱ्यांना याच प्रकारे संकटांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आमच्या मालाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हमीभाव द्यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी करत आहेत. त्यावर राज्य सरकारनं अद्याप विचार केलेला नाही. शेतमाल पिकवायला जो खर्च लागतो तोच जर भरून निघत नसेल तर शेतकरी पुढे जाऊन काय करेल, हा प्रश्न आहे. त्यामुळे मालाला हमीभाव द्या हीच आमची मागणी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी ज्ञानेश्वर पोटे यांनी दिली आहे. वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी, Video सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात लाल कांदा पडून आहे. आणि आता कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत असल्यामुळे शेतकऱ्याला खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे जो कांदा आहे त्याला, अनुदान तरी द्या अशी राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांनी विनवणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.