सोलापूर, 22 जानेवारी : सोलापूर रेल्वे प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोट्यावधी तिकीट बुडव्याना चांगलाच चाप लावला आहे. फुकट्या प्रवाशांना लागला 'रेल्वे'चा ब्रेक लावण्यात आला आहे. तिकीट तपासणी मोहिमेतून तब्बल 32 कोटी 7 लाखांची वसुली करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे विभागात सोलापूर रेल्वे विभागाने विविध मोहिमांतून एकशे साठ कोटींची बचत केली आहे.यात तिकीट तपासणी मोहिमेतून तब्बल 32 कोटी 7 लाखांची वसुली केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 133 टक्के अधिक आर्थिक बचत झाल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
हे ही वाचा : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट; शेअर केला लिपलॉकचा PHOTO
सोलापूर रेल्वे विभागाची नुकतीच वार्षिक आढावा बैठक झाली असून, वार्षिक मोहिमांचा आढावा घेण्यात आला. सर्वच मोहिमेत रेल्वेने मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केली आहे. वर्षभरात अकरा लूप लाइनची प्रतिबंधित गती वाढवली आहे. यामुळे गाडीला विलंब होण्याचे प्रमाण खूप कमी झाल आहे.
हे ही वाचा : पुण्यात लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेसला ब्रेक, मुंबईत काय परिस्थितीत?
इलेक्ट्रिक ट्रॅक्शनची आपूर्ती एनटीपीसी होटगी,चेट्टीनाड, झुआरी आणि अल्ट्राटेक सिमेंट कारखाना सायडिंगपर्यंत वाढवला आहे.यंदा रेल्वेने मालवाहतुकीतून 558 कोटी 79 लाखांचा महसूल मिळवला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 13 टक्के अधिक महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, यंदा रेल्वेतून सोलापुरातील साखरेची मालवाहतूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. 525 रँकची वाहतूक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news, Solapur S13p42