नाशिक, 22 फेब्रुवारी : आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचले आहे. तसंच राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून संजय राऊत यांचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे. ठाण्याचे एसीपी संजय राऊत यांचा भेटीला नाशिकमध्ये पोहोचले. ठाणे पोलिसांच्या 6 जणांचे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पोहोचले आहे. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे. (शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरूवात, बैठकीच्या सुरूवातीलाच मोठा निर्णय) दरम्यान, राऊतांच्या पोलीस सुरक्षेत वाढ केली आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राऊतांची सुरक्षा वाढवली आहे. संजय राऊतांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. मंगळवारपासून नाशिकमध्ये आलेले संजय राऊत आज सिन्नरकडे जाणार आहे. काय म्हणाले होते संजय राऊत? ‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. (’…तेव्हा राष्ट्रवादीच आमच्याकडे आली होती’, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा खुलासा) लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’ अशी मागणी राऊत यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.