जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना होणार नाही त्रास, सोलापूरच्या तरुणांनी काढला भन्नाट तोडगा, Video

आता दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना होणार नाही त्रास, सोलापूरच्या तरुणांनी काढला भन्नाट तोडगा, Video

दुचाकीवर बसण्याचा त्रास यामुळे कमी होणार आहे.

दुचाकीवर बसण्याचा त्रास यामुळे कमी होणार आहे.

Solapur News : दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीचा त्रास या संशोधनामुळे कमी होणार आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

<span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">अनुराग सुतकर, प्रतिनिधी

सोलापूर, 25 मे : बुद्धीमत्तेला तंत्रज्ञानाची जोड दिली तर मानवी आयुष्य सुखाचं होऊ शकतं. ऑटोमोबाईल क्षेत्रातील संशोधन हे यामधील प्रमुख उदाहरण आहे. या क्षेत्रातील संशोधनामुळे जग अधिक वेगवान झालं असून एकमेकांच्या जवळ आलंय. सोलापूरमधील दोन संशोधकांनी या क्षेत्रात एक महत्त्वाचं संशोधन केलंय. त्यामुळे टू व्हिलरवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीचा त्रास कमी होणार आहे. काय आहे संशोधन? अमित टेळे आणि किरण कलशेट्टी या सोलापूरच्या तरुणांची मोटावर्स ही  ही कंपनी आहे.  हे दोघंही ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स आहेत. अमित यांना या क्षेत्रात 15 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. तर किरण देखील गेल्या 8 वर्षापासून यामध्ये कार्यरत आहेत.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

अमित आणि किरण यांची कंपनी बाईक चालवताना येणाऱ्या अडचणींवर काम करते. त्यांनी बाईकच्या अनेक पार्टचं डिझाईन केलंय. तसंच ते मोठ्या कंपन्यांच्या गाड्यांना बसवलं आहे. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला फुटरेस्ट काढण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागतात. अनेकदा हे फुटरेस्ट सहज निघत नाही. त्यामुळे खाली पाय सोडून गाडीनं प्रवास करताना त्यांना इजा होऊ शकते. हा त्रास कमी करण्याबाबत विचार करत असताना किरण यांना स्मार्ट  फुटरेस्ट तयार करण्याची कल्पना सुचली. कसं होतं काम? किरण यांनी स्मार्ट फुटरेस्ट कसं काम करतं याची माहिती दिली आहे. ‘हा स्मार्ट फुटरेस्ट हातानं ओपन करण्याची गरज नाही. तो पायानं दाबल्यानंतर सहज ओपन होतो. त्यानंतर आणखी एकदा दाबल्यावर तो लॉक होतो. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तींचे पाय सुरक्षित राहातात तसंच त्यांना कोणताही त्रास होत नाही.’ वॉशिंग मशिनमधलं पाणी फेकू नका, परत येणार वापरता! पाहा हे खास उपकरण, VIDEO ‘स्मार्ट फुटरेस्टच्या या संशोधनाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सेंटरनं मान्यता दिली आहे. एमएसएमई या सरकी स्टार्टअप विभागानंही याला मान्यता दिलीय. त्यांनी या संशोधनाचे पेटंटही मिळलंय. त्यामुळे याचे संशोधन फक्त याच कंपनीला करता येणार आहे. आगामी काळात केंद्र सरकारकडूनही आम्हाला मोठी मदत मिळू शकते,’ अशी माहिती अमित आणि किरण यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात