जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur Crime News : बिचाऱ्या गरिबाची काय चूक? चौघांनी भर रस्त्यात लाठ्या-काठ्याने केली मारहाण, VIDEO

Solapur Crime News : बिचाऱ्या गरिबाची काय चूक? चौघांनी भर रस्त्यात लाठ्या-काठ्याने केली मारहाण, VIDEO

Solapur Crime News : बिचाऱ्या गरिबाची काय चूक? चौघांनी भर रस्त्यात लाठ्या-काठ्याने केली मारहाण, VIDEO

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे कपडे इस्त्री करून घेण्याच्या कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

प्रितम पंडीत (सोलापूर), 30 डिसेंबर : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे कपडे इस्त्री करून घेण्याच्या कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये चार संशयित आरोपींवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा महादेव सोनटके यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे.

त्यावरून अमोल रामा गुंड, समाधान बिभीषण गुंड, साहेबराव चांगदेव व नवनाथ रामा गुंड (सर्व रा. शेटफळ नागोबाचे ) या संशयित आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. करमाळा पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान फिर्यादी सोनटक्के यास पुढील उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  विद्येच्या माहेरघरात चक्क Phd चोरी! गाईडचा प्रताप; म्हणे मी दुसऱ्या विद्यार्थिनीला शब्द दिला..

कॉलेज तरुणांमध्ये तुफान राडा

अनेकदा क्षुल्लक कारणावरून झालेला वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यातही कॉलेज भांडणाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. कधी बॉयफ्रेंडवरून, तर कधी जेलसीवरून तर कधी रस्त्यावर ही भांडण पाहायला मिळतात. अशातच कुणी भांडणाचा व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाकल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साऊथ चित्रपटात सुध्दा पाहायला मिळणार नाही अशी दौंड तालुक्यातील वरवंड मधील  विद्यार्थांची तुफान हाणामारी दोन गटात झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयामधील एका गटाने दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केले. आजूबाजूच्या नागरिकांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे ही मुलं शाळेत शिकायला जातात की हाणामारी करायला जातात असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

जाहिरात
जाहिरात

नाशिकमध्येही तरुणींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मुलींची फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आज सकाळपासून फेसबुक, व्हाटसप वर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून छोट्या गोष्टींवरून झालेले हे भांडणं विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा :  सराईत गुन्हेगारांचा कोयत्याने नागरिकांवर हल्ला; पोलिसांनी पाठलाग केला अन्.., पुण्यातील घटनेचा VIDEO

जाहिरात

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका कॉलेजमध्ये हा तुफान राडा झाला आहे. यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणीची त्रेधातिरपीट उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर व्हिडीओत दिसणाऱ्या दुसऱ्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सकाळची वेळ असल्याने कॉलेजचा हजारो विद्यार्थ्यांचा गराडा या तरुणींचे भांडण  पाहत व्हिडीओ काढत असल्याचे दिसते आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात