जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडं लक्ष देणाऱ्या शिक्षिकेचा गौरव

शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडं लक्ष देणाऱ्या शिक्षिकेचा गौरव

शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडं लक्ष देणाऱ्या शिक्षिकेचा गौरव

स्वाती अनिल शिंदे यांनी आपल्या चार प्रकल्पातून अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नव तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 7 मार्च :  नव्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकाची खऱ्या अर्थानं परीक्षा असते.  पुणे जिल्ह्यातील मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या स्वाती अनिल शिंदे यांनी आपल्या चार प्रकल्पातून अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नव तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल सर फाऊंडेशननं घेतली असून त्यांचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. काय आहेत प्रकल्प? शिंदे यांनी राबवलेल्या पहिल्या प्रकल्पात  66 आदिवासी शाळेतील 1600 मुलांना रोज पूरक पोषण आहाराचे नियोजन केले होते.त्या प्रकल्पामुळे मुलांचा बॉडी मास इंडेक्स वर्षभरात दीड टक्क्यांनी वाढला अशी आकडेवारी समोर आली आहे. दुसऱ्या प्रकल्पातून 600 शाळा त्यांनी दप्तरांच्या ओझंशिवाय शिक्षणाकडे वाटचाल कशी करता येईल या संबंधित ई लर्निंगचे धडे त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आगामी काळ हा सौरऊर्जेवर अवलंबून असल्यानं त्यांनी 550 सरकारी शाळांना सौरऊर्जेचं महत्त्व पटवून दिलं आहे. चौथ्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पातून त्यांनी आदिवासी भागातील आणि ग्रामीण जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना फिरत्या व्हॅनमधून उत्तम संगणक प्रशिक्षणही दिलं आहे. सापशिडीतून शिकवलं गणित, कल्पक शिक्षकाला मिळाला मोठा पुरस्कार! Video त्यांच्या या प्रकल्पामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दरचना आणि वाक्यरचना सहजासहजी करता येऊ लागल्या, शिवाय संगणकीय प्रणालीतील वर्ल्ड पॅड फाईल सेव्ह करणे, फाईल चित्रण करणे यासोबतच चिमुकले हात माउस हाताळण्यास शिकले आहेत. सर फाउंडेशन चा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार हा स्वाती शिंदे यांना मिळाला असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    येणाऱ्या काळात ग्रामीण विभागातील मुलींचे स्वास्थ्य आणि आरोग्य यांच्यावर प्रामुख्याने काम करणार आहे. शिवाय लैंगिक शिक्षणाचा जागर करीत असताना विद्यार्थिनींना कोणत्याही समस्येचे निराकरण सहजासहजी करता यावे याकडे लक्ष देणार आहे, अशी प्रतिक्रिया या पुरस्कारानंतर शिंदे यांनी व्यक्त केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात