प्रीतम पंडित (सोलापूर), 10 जानेवारी : बेघर आणि गोरगरिबांना अल्पदरात भोजन देवून त्यांची भूक भागविणाऱ्या शिव भोजन केंद्र चालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शिव भोजन केंद्राचे सुमारे 60 लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. परिणामी वेळेवर अनुदान न मिळाल्याने 32 पैकी तब्बल 15 शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहे. जिल्हा पुरवठा विभागातील अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे शासनाच्या या चांगल्या योजनेचे सोलापूर जिल्ह्यात तीनतेरा वाजले आहेत.
गोरगरीब,बेघर,असंघटीत कामगार अशा लोकांना अवघ्या दहा रुपयांमध्ये जेवण मिळावे या उद्दात हेतूने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन केंद्रे सुरु केली आहेत. या केंद्रांमुळे कोरोना काळात अनेकांना याचा लाभ झाला.सध्याही मजूर, बेघर, अंसघटीत कामगारांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळतो. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना गेल्या सहा
हे ही वाचा : भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? मु्ख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बॅनरबाजी
महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने केंद्र चालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक अडचणींमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 15 शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहे तर उर्वरीत केंद्रांना ही घरघर लागली आहे. शासनाची चांगली योजना सुरु राहावी यासाठी थकीत अनुदानाची रक्कम संबंधीत केंद्र चालकांना मिळावी अशी मागणी होत आहे.
बंद झालेली शिवभोजन केंद्रे
करमाळा 2, माळशिरस 1, सांगोला 2, माढा 2,मंगळवेढा1, पंढरपूर 2
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिवााळी अधिवेशनामध्ये नागपूरमधील भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या मुद्दाचे पडसाद ठाण्यात पाहण्यास मिळाले आहे. ठाणे पालिकेसमोरच भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
आज सकाळी ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगर पालिकेच्या समोर बॅनर लावण्यात आले होते. भूखंडाचं श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असा बॅनरच्या माध्यमातून सवाल विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे, या बॅनरवर कोणत्याही पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव नव्हते.