अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 15 जून: पृथ्वीवर 71 टक्के पाणी आहे. तरीही अनेक ठिकाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवतं. कारण उपलब्ध पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. बाकी पाणी समुद्रात असून ते पिण्यास योग्य नाही. पण सोलापूरच्या संशोधकांनी एक अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं असून त्याद्वारे आता समुद्राचं पाणीही बिनधास्त पिता येणार आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे प्राचार्य बी. के. सोनगे यांना त्यासाठी पेटंट देखील मिळाले आहे. प्राचार्य सोनगे यांचं संशोधन सोलापुरातील एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी कॉलेजमधील प्र. प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी जलशुद्धीकरणावर संशोधन केले आहे. समुद्राचे,बोअरवेलचे आणि विविध आस्थापनतील सांडपाणी पिण्यायोग्य नसते. तसेच आर.ओ. प्लांटमधून साधारणत: 70% अशुध्द पाणी निघते. असे अशुध्द पाणी शुध्द करण्याचे तंत्रज्ञान डॉ. सोनगे यांनी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विकसित केले. या तंत्रज्ञानास भारतीय बौध्दीक संपदा विभागाकडून ‘प्युरीफिकेशन ऑफ इंपोटेबल ॲण्ड वेस्ट वॉटर’ या नावाने पेटंट मंजूर झाले आहे.
अशा ठिकाणी संशोधनाचा फायदा जगातील काही भागामध्ये भुगर्भीय पाण्यामध्ये अतिक्षारयुक्त, विषारी घटक व जड धातूचे प्रमाण जास्त असते असे पाणी पिल्यामुळे माणसाचे आणि प्राण्यांचे आरोग्य बिघडते. तसेच समुद्रकिणाऱ्यावरील लोकांना व जहाजावरील लोकांना मुबलक प्रमाणात क्षारयुक्त पाणी उपलब्ध असूनही ते पाणी पिता येत नाही. अशा ठिकाणी सदरच्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता अधिक आहे. काही भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे. अशा ठिकाणी तयार होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर गरजेचा असतो. तिथे सदरचे तंत्रज्ञान वापरून सांडपाणी पिण्यायोग्य बनवता येते. औष्णीक ऊर्जा वापरून पाणी शुद्ध शुध्द पाण्यासाठी, भुगर्भातून पाणी उपसा करून आर.ओ. सयंत्रामधून शुध्द केल्यामुळे 70% पाणी हे सांडपाणी म्हणून फेकून दिले जाते आणि यामुळे पर्यावरणाची हानी होते. या संशोधनामुळे पर्यावरणाची हानी काही प्रमाणात थांबणार आहे. कुठलेही अशुध्द पाणी न उकळता, सौरऊर्जा, उष्णता व उर्जेचा उपलब्ध स्रोत आणि इतर वाया जाणारी औष्णीक उर्जा वापरून पाणी शुध्द करता येते हे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. महाराष्ट्रातलं असं मंदिर जे नदीपात्रात आहे उभं, पूर आल्यावर काय होतं? पाहा हा VIDEO भविष्यात पाण्याचं संकट निर्माण होणार नाही हे संशोधन पूर्ण करण्यासाठी एन.के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, डसॉल्ट सिस्टम व सिध्दराज कुंभार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन व मदत लाभली. प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेणारा शिक्षक अशी प्राचार्य सोनके यांची ओळख आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्या बुद्धीला संशोधनाची जोड देत हा पेटंट मिळवून घेतला आहे. भविष्यात अशा संशोधकांमुळे पिण्याच्या पाणीप्रश्नाचा सामना करावा लागणार नाही हे मात्र निश्चित आहे.