जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोलापूरच्या पुजाची कमाल, हार्वर्ड विद्यापीठात मिळवले स्थान

सोलापूरच्या पुजाची कमाल, हार्वर्ड विद्यापीठात मिळवले स्थान

सोलापूरच्या पुजाची कमाल, हार्वर्ड विद्यापीठात मिळवले स्थान

अमेरिकेतील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठच्या अस्पायर लीडर प्रोग्रॅम मध्ये पूजा गुंजाळ हिची निवड झाली आहे. अत्यंत कठीण अशा पाच वेगवेगळ्या टप्प्यानंतर ही निवड झाली आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    सोलापूर 27 ऑक्टोबर : अमेरिकेतील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठाच्या अस्पायर लीडर प्रोग्रॅम मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील भगतवाडीतील पूजा शंकर गुंजाळ हिची निवड झाली आहे. जगभरातून निवड करण्यात आलेल्या 364 प्रतिनिधींमध्ये पूजा गुंजाळ हिची यशस्वीपणे निवड करण्यात आली. अत्यंत कठीण अशा पाच वेगवेगळ्या टप्प्यानंतर ही निवड झाली आहे.

    यामध्ये अमेरिका , रशिया, चिली, नायजेरिया इत्यादी देशांच्या प्रतिनिधींसोबत भारताचे प्रतिनिधित्व पूजा गुंजाळ करणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून ती एकमेव आहे. पूजाचे वडील शंकर गुंजाळ यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट असताना मुलीचे शिक्षण पूर्ण केले. शंकर गुंजाळ हे भूमिहीन शेतकरी असून त्यांनी पूजाच्या शिक्षणाला काहीच कमी केली नाही. पूजाचे प्राथमिक शिक्षण हे भगतवाडी शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण हे शहाजीराजे उमाजी राजे भोसले हायस्कूल जिंती येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे शारदानगर बारामती येथे झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिकत असताना तिने तिचे पदवीचे शिक्षण हे डॉक्टर बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग पालवन दापोली विद्यापीठ इथे पूर्ण केले.

    हेही वाचा : महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मुलीची गरूडझेप, कॅनडाच्या युनिव्हर्सिटीत करतेय नॅनोकंपोझिटवर संशोधन!

    गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी मासिक पाळी या विषयावर मी काम करीत आहे. त्यांच्या संदर्भात असणाऱ्या समस्या आणि महिलांच्या आरोग्या निमित्त उद्भवणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर मी बारकाईने अभ्यास करत आहे. पुण्यातील समाज बंद या संस्थेच्या माध्यमातून मी सध्या सांगली जिल्ह्यात स्थित महिलांसाठी काम करत आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट कडून मला ऑफर आली आणि मी या प्रोग्रामिंग साठी जॉईन झाले. या सर्व यशामागे आई मंदा गुंजाळ व वडील शंकर गुंजाळ यांचे प्रमुख योगदान आहे. ज्यांनी खंबीरपणे कायम मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे छोट्याशा गावातील मुलगी अमेरिकेतील विद्यापीठात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणार आहे, असं पूजा गुंजाळने सांगितले.

     काय आहे अस्पायर लीडर प्रोग्राम ?

    हार्वर्ड विद्यापीठात दरवर्षी जगभरात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हा एक स्पेशल प्रोग्राम आहे. त्यामध्ये ज्या परिवारातील विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे प्रत्यक्षात फारच कमी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे वयोगट हे 18 ते 26 वर्ष आहे अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येतो. हा प्रोग्राम एक प्रतिष्ठित प्रोग्राम म्हणून मानला जातो. यामध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात काही स्टार्टअप किंवा करिअरच्या संदर्भात लीडरशिप करायचे असेल तर आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी विद्यापीठ मदत करते.

    हेही वाचा : मोठी खूशखबर! MPSC टेक्निकल सर्व्हिस अंतर्गत तब्बल 378 पदांसाठी भरती; अर्जाची आजची शेवटची तारीख

    अस्पायर प्रोग्राम यासाठी निवड कशी होते?

    -अस्पायर प्रोग्राम साठी दरवर्षी जगभरातील भरपूर विद्यार्थी आपली नावे नोंद करीत असतात.

    -साधारणपणे पाच टप्प्यात ही निवड प्रक्रिया पार होते.

    -शंभर टक्क्यांपैकी फारच नगण्य विद्यार्थ्यांचे यामध्ये सिलेक्शन होत असते.

    -पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्वरूपाचे असाइनमेंट किंवा प्राथमिक टेस्ट ही ऑनलाईन स्वरूपात होते.

    -त्यानंतर विद्यापीठात आणि विद्यापीठाचे अंतर्गत स्थित असणाऱ्या प्रोग्राम पैकी कोर्स प्रोग्राम हा त्यांना निवडण्याचे ही दुसरी स्टेज असते.

    -तिसऱ्या स्टेजमध्ये संबंधित विद्यापीठात म्हणजेच अमेरिकेतील हार्वर्ड या विद्यापीठात या संलग्नित असणाऱ्या शिक्षकांची ओळख आणि केस स्टडी संबंधित प्राथमिक स्वरूपातील चर्चा होते.

    -चौथा टप्पा हा या लीडरशिप प्रोग्रामिंग मधला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तो म्हणजे या चौथ्या टप्प्यात विद्यार्थ्याला फॉरेन युनिव्हर्सिटी मध्ये आपल्या शाळेचे किंवा संलग्नित विद्यापीठाचे रेकमेंडेशन हे प्रत्यक्षात आर्थिक परिस्थिती जाणून घेत सदरच्या विद्यापीठाला सबमिट करावे लागते.

    -पाचवा टप्प्यामध्ये या चार टप्पे पार करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप डिस्कशन होते आणि त्यांच्या सोशल इम्पॅक्ट झालेल्या केस स्टडी वर शेवटची फायनल चर्चा होते. आणि ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे फारच कमी आहे आणि ज्यांना अस्पायरिंग लीडरशिप करायचे आहे अशा 18 ते 26 वयोगटातील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे निवड होते. ही प्रक्रिया हार्वर्ड विद्यापीठातील मुख्य वेबसाईटवर ऑनलाइन स्वरूपात पार पडते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: career , solapur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात