मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काय झाडी, काय डोंगारवरुन थेट अमृताचे बोल.. शहाजीबापूंचा नवा व्हिडीओ व्हायरल

काय झाडी, काय डोंगारवरुन थेट अमृताचे बोल.. शहाजीबापूंचा नवा व्हिडीओ व्हायरल

शहाजीबापूंचा नवा व्हिडीओ व्हायरल

शहाजीबापूंचा नवा व्हिडीओ व्हायरल

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..' या संवादामुळे प्रसिद्ध झालेले शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

सोलापूर, 12 मार्च : 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील...' या संवादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं आणखी एक रुप पाहायला मिळालं आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांनी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चक्क प्रवचन दिले आहे. त्यांच्या या प्रवचनाचा व्हिडीओ आथा व्हायरल होत आहे.

आमदार शहाजी बापू पाटील नव्या रुपात

राजकीय व्यासपीठावरून नेहमीच टोलेबाजी करणारे शहाजी बापू पाटील यांनी वारकरी वेश परिधान करून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये प्रबोधनात्मक प्रवचन दिले आहे. पंढरपूर तालुक्यातील सोनके गावामध्ये त्यांच्या या प्रवचनाचा जाहीर कार्यक्रम रात्री संपन्न झाला. आमदार शहाजी बापू पाटील हे इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मराठी भाषेवरही तितकेच प्रभुत्व आहे. सर्व व्यासंगी व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. आमदार शहाजी बापू पाटलांचे वारकरी संप्रदायातील प्रवचनकाराचे नवे रूप लोकांना प्रथमच पाहायला मिळाले आहे.

शहाजी पाटील कोण आहेत?

शहाजी पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. आसाममधून आपल्या एका कार्यकर्त्याला केलेला त्यांचा कॉल राज्यभर प्रचंड व्हायरल झाला होता. सध्या शिवसेनेतून आमदार असलेल्या शहाजी पाटील यांचा राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआयपासून झाली. या काळात ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते. एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.

1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते.

First published:

Tags: Shivsena, Solapur