मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मनोरंजनातून विद्यार्थ्यांना शिकवला मोठा धडा, शिक्षकाच्या कामाचा देशपातळीवर सन्मान, Video

मनोरंजनातून विद्यार्थ्यांना शिकवला मोठा धडा, शिक्षकाच्या कामाचा देशपातळीवर सन्मान, Video

X
मनोरंजनातून

मनोरंजनातून पर्यावरणाचे महत्व सचिन जगताप विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावर पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मनोरंजनातून पर्यावरणाचे महत्व सचिन जगताप विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावर पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur, India

  अनुराग सुतकर, प्रतिनिधी

  सोलापूर, 21 मार्च : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाऊंडेशन महाराष्ट्र आणि आय.आय.एम. अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे नुकतीच नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्स झाली. या नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्समध्ये सोलापूरच्या मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांना “नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड” या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  मनोरंजनातून पर्यावरणाचे महत्तव

  सचिन जगताप यांनी चित्रपट महोत्सवातून सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन या अंतर्गत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांमध्ये पर्यावरण स्नेही संदेश देण्याची संकल्पना पुढे आणली. छोट्या छोट्या चित्रफितींच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांच्या समोर हसत-खेळत मनोरंजनातून पर्यावरणाचे महत्व रुजविले आणि मुलांमध्ये जागर होऊन बदलही निर्माण होऊ लागले. सचिन यांच्या याच नविन उपक्रमाला राष्ट्रीयस्तरावर पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.

  चित्रपटातून संस्कार 

  चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहेच, परंतु चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधन करणारा, विशेषतः संस्कारक्षम बालकांच्या मनावर चित्रपटातून संस्कार घडविणारा शिक्षक म्हणून सचिन जगताप यांची ओळख आहे. लहान मुलांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी, मुलांमध्ये पर्यावरणाची गोडी निर्माण करण्यासाठी चित्रपटासारख्या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सचिन जगताप यांनी आजवर अनेक शहरातील हजारो विद्यार्थ्यांना या माध्यमातून जनजागृती आणि समाजप्रबोधनातून अनेक संदेश दिले आहेत.

  पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पाणी वाचवा, मुली वाचवा, पर्यावरण संरक्षण काळाची गरज, स्वच्छता अभियान, प्लास्टिक वापरू नये, प्राणी आणि जलसंपत्तीयांचे महत्व, ओला कचरा-सुका कचरा, वाहतूक जनजागृती, प्रेरणादायी लघुचित्रपट अशा एक न अनेक महत्त्वाच्या विषयांवरील नेमके संदेश देणाऱ्या चित्रफिती मुलांना स्क्रीनवर दाखविल्या आहेत, असं सचिन जगताप यांनी सांगितले.

  Solapur News: सापशिडीतून शिकवलं गणित, कल्पक शिक्षकाला मिळाला मोठा पुरस्कार! Video

  सामाजिक उपक्रम 

  या माध्यमातून अनेक शाळा, वृद्धाश्रम, सामाजिक संस्था, कॉलेज, रोटरी क्लब येथे आजवर हा सामाजिक उपक्रम राबविला गेला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन पद्धत प्रभावी करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर आधारित सचिन यांना यश आले आणि याचीच दखल घेत त्यांनी सादर केलेल्या चित्रपट महोत्सवातून सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. सचिन यांना नुकताच राज्यस्तरीय लघुपट माहितीपट निर्मिती स्पर्धेतील महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार मिळाला आहे.

  शिक्षणाचं कार्य हे अतिशय पवित्र कार्य. शिक्षक केवळ शिक्षण देत नाहीत तर चांगली मूल्ये देऊन आपल्या विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडविण्यात मोठा वाटा उचलतात. सध्या डिजिटल शिक्षणाचे महत्व वाढत असताना या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या सचिन जगताप यांच्या शैक्षणिक कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणे ही बाब अतिशय मानाची आहे.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Solapur