मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्मार्ट सिटीच्या कामाने सोलापूरकर त्रस्त, नवीन रस्त्याचे झाले हाल, Video

स्मार्ट सिटीच्या कामाने सोलापूरकर त्रस्त, नवीन रस्त्याचे झाले हाल, Video

X
सोलापुरात

सोलापुरात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू आहेत. यामध्ये नवीन झालेल्या रस्त्याचे हाल झाले आहेत.

सोलापुरात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू आहेत. यामध्ये नवीन झालेल्या रस्त्याचे हाल झाले आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

    सोलापूर, 19 डिसेंबर : गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू आहेत. सध्या शहरातील पांजरापोळ चौक ते रूपाभवानी मंदिर मार्ग हा स्मार्टसिटीच्या अंतर्गत डेव्हलप होत आहे. या ठिकाणचा नवा रस्ता करून अवघा एक महिनाही झाला नाही तोपर्यंत रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. अंडरग्राउंड 5 जी वायरिंग कनेक्शन आणि एसटी विभागाच्या इलेक्ट्रॉनिक बसचे चार्जिंग पॉईंटला जोडणारे हाय व्होल्टेज वायर कनेक्शन जोडण्याकरिता हा रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे नवा रस्ता होतोय तोवर तो खोदायचा आणी त्या रस्त्याची सगळी वाट लावायची असं काम प्रशासन करत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे.

    सोलापूर शहरामध्ये सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. सामान्य नागरिकाला दररोज रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. शिवाय सर्वांत मोठी समस्या म्हणजे रस्त्यावर असणारे खड्डे हे दिवसेंदिवस धोकादायक बनत जात आहेत. त्यामुळे विद्यार्थांना आणी वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणी नविन रस्ता होतोय तोवर तो खोदायचा आणी त्या रस्त्याची सगळी वाट लावून टाकायची एवढंच काम चालु आहे. तरी ही कामे लवकरात लवकर संपवावी ही आमची मागणी आहे, असं नागरीक सुरेश बचाटे यांनी सांगितले.

    सोलापूरकरांना मिळाली नववर्षाची भेट, पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची अपडेट

    'तात्काळ लक्ष द्यावं'

    सोलापूर शहरामध्ये सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना धूळ खड्डे यांचा त्रास वेळोवेळी होतो. त्यामध्ये नवीन झालेले रस्ते सध्या खोदण्याचे काम सुरु आहे. महापालिकेवर सध्या प्रशासन आहे. त्यामुळे आयुक्तांनी अशा कामांवर लक्ष ठेवून ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, असे पृथ्वीराज मोरे यांनी सांगितले.

    लवकर संबंधितांवर कारवाई होईल

    या संदर्भात स्मार्ट सिटी कार्पोरेशनचे चेअरमन असीम गुप्ता यांना विचारले असता ते म्हणाले की, महापालिका प्रशासनाचा कारभार आणि स्मार्ट सिटीचे अनियमित कामे याचा कुठेच मेळ लागत नाही. हे चित्र स्पष्ट दिसत असताना कामे कशी केली गेली आणि किती वेळात कोणत्या पद्धतीने पूर्ण करण्यात आली याची चौकशी होईल आणि त्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

    First published:

    Tags: Local18, Solapur