सोलापूर 17 डिसेंबर : येत्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2023 पासून सोलापूरकरांना एक दिवस आगोदर पाणी मिळणार आहे. ज्या भागामध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो तिथे तीन दिवसाआड तर ज्या भागामध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्या भागामध्ये दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल उगले तेली यांनी दिली आहे.
पुणे येथे पालकमंत्री विखे पाटील आणि उजनी सिंचन कालवा प्रकल्प अधिकारी यांची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये सोलापूरला महापालिकेला पाणी देण्यासाठी आणखी एक संलग्नित नवीन पाईपलाईन बनवली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारी 2023 पासून सोलापूरकरांना एक दिवस आगोदर पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सोलापूरमध्ये गोवरचा धोका वाढला, महापालिका राबवणार विशेष मोहीम
तसेच सोलापूर शहराला होणारा पाणीपुरवठा नियमित सुरू व्हावा या उद्देशातून पाणीपुरवठ्याची सिस्टीम सुधारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्काडा व वॉटर फ्लोअर मीटर ही सिस्टीम सर्व शहरात नव्याने चालू होणार आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा सिस्टीम ही पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही शितल उगले तेली यांनी सांगितले. अनियमित असणाऱ्या पाणीपुरवठ्याचा जनतेला त्रास उजनीच्या पाण्याचा योग्य निचरा आणि त्याची पुरवठा सिस्टीम महापालिका प्रशासनाने लक्षात घेतली असता त्यामध्ये सोलापूरला दररोज पाणी मिळू शकते. परंतु अनियमित असणाऱ्या पाणीपुरवठ्याचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तरी आशा करूयात की शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, असे मत नागरिक गणेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

)







