बीड, 19 जानेवारी : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. आव्हानात्मक परीक्षेला सामोरे जातात. जागा कमी आणि उमेदवारांची संख्या प्रचंड असल्यानं स्वाभाविकच या परीक्षेत अनेकांना अपयश येतं. पण काही मोजके विद्यार्थी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर यशस्वी होतात. बीड जिल्ह्यातल्या माळापुरी गावातील एका मुलगा या परीक्षेत यशस्वी होऊन थेट न्यायाधीश झाला आहे.
बीडपासून अवघ्या काही अंतरावर माळापुरी हे गाव आहे. या गावातील शेतकरी कुटुंबातल्या बेग हाशीम मोहम्मद यांनी हे यश मिळवलंय. त्यांनी यापूर्वी काही दिवस बीडच्या कोर्टात वकिलीची प्रक्टीस केली होती. त्याचबरोबर ही वकिली सांभाळात वडिलांना शेतीमध्ये नेहमी मदतही केलीय. वकिलीची प्रॅक्टीस, शेतीमधील कष्ट हे सर्व सांभाळत त्यांनी एमपीएसीचा अभ्यास केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत
मार्च महिन्यात न्यायालयांच्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्या. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत बेग हाशीम हे उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.
बीडचा शुभम राज्यात पहिला, पाहा 4 वर्षांच्या परिश्रामानंतर कसं मिळालं यश? Video
एक स्वप्न अपूर्ण पण...
बेग हाशिम मोहम्मद यांच्या वडीलांना चार एकर जमीन आहे. याच शेतात आपल्या वडिलाला मदत करत करत त्याने शिक्षणाला सुरुवात केली पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मोठ्या शहरातील विद्यालयात शिक्षण घेता आले नाही. त्याचबरोबर त्यांचे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचं स्वप्नही अपूर्ण राहिलं.
डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतर बेग हाशिम यांनी बीडमधूनच आधी बीएस्सी आणि कायद्याचं शिक्षण घेतलं. वकिली आणि शेती सांभाळात एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. कष्टाच्या जोरावर त्यांनी सर्व अडचणींवर मात करत हे यशाचं शिखर गाठलं आहे.
कोशिश करने वालों की...
'मी यापूर्वी 2019 साली एमपीएसची परीक्षा दिली होती. त्यावेळी मुलाखतीच्या टप्प्यात मला अपयश आलं. त्यानंतर तीन वर्ष पुन्हा अभ्यास केला आणि यावर्षी यश मिळाले. 'लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की हार नही होती,' हा मंत्र लक्षात ठेवून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न न सोडता अभ्यास केला पाहिजे,' असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Career, Local18, Success story