सोलापूर 21 डिसेंबर : आजकाल सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी युवक एक वेगळा मार्ग निवडत आहेत. विषयाला अनुसरून व्यंगचित्र, व्यक्तिचित्र, हॉलीवुड, बॉलीवूड किंवा इतर कोणत्याही चित्रपटातील एखाद्या सीनचा वापर करून अर्थपूर्ण संदेश देणारे मीम्स बनवू लागले आहेत. यामुळेच लव सोलापूर आणि सोलापुरी मीमवाला याच्या माध्यमातून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या शहरातील युजर्स साठी प्रथमच मीम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणते विषय यामध्ये मांडता येणार?
या स्पर्धेसाठी सोलापुरी भाषा, सोलापुरी सांस्कृतिक ठेवा, सोलापूरचे राजकीय विषय, स्मार्ट सिटीची कामे, स्थलांतरित सोलापूरकर, विविधतेत एकता असणारे सोलापूर असे विषय देण्यात आले आहेत किंवा ट्रेडिंग मधील कोणतेही विषय स्पर्धक मांडू शकतात. सोलापुरातील प्रश्न, सोलापुरातील पर्यटन किंवा इतर कोणताही सांस्कृतिक वारसा जगापर्यंत पोहोचला पाहिजे हा एकच हेतू असल्याचे स्पर्धा आयोजक शिवकुमार देठे यांनी सांगितले. स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके आणि आकर्षक बक्षीस म्हणून कस्टमायझ टी-शर्ट हुडी देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त सोलापूरकरांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
स्मार्ट सिटीच्या कामाने सोलापूरकर त्रस्त, नवीन रस्त्याचे झाले हाल, Video
असे असतील स्पर्धेचे नियम स्पर्धेचे नियम
-एका स्पर्धकाचे जास्तीत जास्त 5 मीम्स स्विकारले जातील
-कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी
- सदर मीम्स जर पोस्ट करणार असाल तर @lovesolapur @solapurimemewala ला टॅग करणे व कंटेंट सोबत #lovesolapur #solapurimemewala #solapurimemes हे Hasgtag टाकणे अनिवार्य आहे.
-सदर मीम्स या +91 90969 34241व्हाट्सअँप नंबरवर पाठवावे. सोलापुरी मीमवला व लव सोलापूर पेजला मेसेज करावे किंवा इंस्टग्राम https://instagram.com/lovesolapur फेसबुक https://www.facebook.com/lovesolapurbe या लिंक वर आपली नावे इन रोल करावेत.
स्पर्धेची अंतिम तारीख 31 डिसेंबर हि असेल नवीन वर्षातील येणाऱ्या पहिल्या रविवारी विजेते घोषित होतील आणि बक्षीस वितरित केले जातील .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Social media, Solapur