पंढरपूर, 18 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात सरकार आणलं. राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिंदे गटावर खोके घेतल्याचा आरोप होत आहे. या आरोपांवरून राज्यात मोठा वादही निर्माण झाला. या मुद्द्यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी राज्यात पुलोदचा प्रयोग केला तेव्हा त्यांनी किती खोके घेतले? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. राज्यातील आमदार विकावू आहेत का? सत्ता गेल्याच्या वैफल्यातून खोके टीका केली जाते. यांच्या काळात जनता वाऱ्यावर होती, फक्त समान लूट करणे, एवढाच कार्यक्रम यांच्या काळात होता, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध करण्यात आला. यावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी तमाशा मांडला आहे. विचारांचे अधिष्ठान नसलेल्या राहुल गांधींचा सावरकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करावा तितकाच कमी आहे,' असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं.
'औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, त्याचं समर्थन शिवसेना करते. देशभक्ती करणाऱ्या लोकांव देशद्रोहाचा गुन्हा यांच्याकाळात दाखल झला. शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेतली आहे. बाळासाहेबांच्या मनाला काय यातना होत असतील,' असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.