सोलापूर, 13 एप्रिल : सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील नागणूसूर येथील सितामाता शाळेत नोकरीस लावतो म्हणत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महाराजांनी फसल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्याच्या उच्च शिक्षित मुलाला श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी 28 लाखाला गंडा घातला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी श्रीकंठ स्वामीवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला. यामध्ये श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी फरार झाला आहे. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अनेक युवकांना नोकरी लावतो म्हणून असेच टोप्या घातल्याचे पुढे येत आहे.
दिवगंत वडिलांचं स्वप्न पूर्ण! आईच्या कष्टाचं चीज करत मोना राज्यात तिसरी, पाहा Videoनागणसूर येथील बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी एका व्यक्तीचा विश्वास संपादित केला. यानुसार त्या महाराजांनी काळजी करु नको मी तुला शिक्षक म्हणून सितामाता शाळेत नोकरी देतो असे सांगितलं. त्याबदल्यात मला तू 28 लाख द्यायचे असे सांगितले.
एक वर्षापूर्वी शांतवीर शरणप्पा कळसगोंडा यांना सितामाता शाळेत नोकरीस लावण्याचे अमीष महाराजांनी दिले. यासाठी कळसगोंडा 5 एकर जमिन विकायचा निर्णय घेतला. शेती विकून त्यांनी 28 लाख रुपये गोळा केले.
आईनं दागिने गहाण ठेवून दिले शिक्षणाला पैसे, शेतकऱ्याची लेक झाली वनाधिकारी, पाहा Videoश्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी 28 लाख रुपये घेऊनही शांतवीर शिक्षक पदावर रुजू करून घेतले नाही. 8 महिन्यानंतर श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांना पैसे परत मागितले असताना त्यांनी दमदाटी केली. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांना यांच्या विरोधात दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.