मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूरचा स्पेशल 12 भाज्यांचा गरगट्टा कसा बनतो? पाहा Video

सोलापूरचा स्पेशल 12 भाज्यांचा गरगट्टा कसा बनतो? पाहा Video

X
Solapur

Solapur special Gargatta Bhaji : संक्रातीच्या सिझनमध्ये सोलापुरात प्रत्येकच घरात 12 भाज्यांचा गरगट्टा बनतो.बारा भाज्यांचा गरगट्टा कसा बनतो ते पाहूया

Solapur special Gargatta Bhaji : संक्रातीच्या सिझनमध्ये सोलापुरात प्रत्येकच घरात 12 भाज्यांचा गरगट्टा बनतो.बारा भाज्यांचा गरगट्टा कसा बनतो ते पाहूया

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 13 जानेवारी : देशात प्रत्येकच ठिकाणी वेस बदलली की खाद्यसंस्कृती ही बदलते. सध्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्ह्यात फार पूर्वीपासून विशिष्ट खाद्य संस्कृती जोपासण्यात येत आहे.

संक्रातीच्या सिझनमध्ये सोलापुरात प्रत्येकच घरात 12 भाज्यांचा गरगट्टा बनतो. गरगट्टा म्हणले की आठवते पालक आणि हिरवी मिरची यांचे एकत्रित केलेल्या मिश्रणाला विशिष्ट प्रकारे फोडणी देऊन तयार केलेला पदार्थ. परंतु सोलापुरात चक्क फळभाज्या आणि पालेभाज्या मिळून चक्क बारा भाज्यांचा हा गरगट्टा बनतो. ही स्वतः सोलापूरकरांनी तयार केलेले सोलापूरचे रेसिपी मानली जाते. आपल्या आवडीनुसार कडधान्य, फळभाज्या आणि सिझनमध्ये येणाऱ्या पालेभाज्या एकत्र करुनही हा गरगट्टा केला जातो.

गरगट्टा कसा तयार करणार?

-पहिल्यांदा पालक, चुका, पेरू हिरवी मिरची ,घेवडा, मेथी,शेंगा, गाजर ,बोर ,चिंच , हरभरा डाळ आणि मूग डाळ घ्यावी

- सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या धुवून त्या व्यवस्थित कट कराव्या.

- त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ आणि सोलापूरचे काळे तिखट घालावे.

- पूर्वी हा गरगट्टा चुलीवर केला जात होता. आता बदलत्या काळानुसार तो गॅसवर बनवला जातो.

- पाण्याच्या मिश्रणाला एक उकळी आली की त्यामध्ये हे सर्व भाज्या व्यवस्थित उकडून घ्याव्यात.

- गरगट्टा बनवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ते सर्व मिश्रण एकत्रितपणे घरटणे. जवळपास दहा ते पंधरा मिनिटं स्वतः हाताने तो गरगट्टा घरटून सर्व्ह करावा.

Makar Sankrant 2023 : कशी बनवतात भोगीची पारंपरिक भाजी?

गरगट्टा खाण्यासाठी हाच सिझन योग्य का?

यात्रेच्या निमित्ताने भाविक मोठ्या प्रमाणात नंदिध्वज उचलण्याची तयारी करत असतात. जवळपास सव्वाशे किलोचे नंदीध्वज आपल्या कमरेवर पेलत शहरातील 68 लिंगांना ते प्रदक्षणा घालतात. जानेवारी महिन्यात थंडी आणि ऊन हे सोलापुरात पूर्वीपासूनच जास्त आहे.

या सर्व भक्तांच्या  भक्त गणांच्या अंगात ऊर्जा राहावी याशिवाय शरीराला आवश्यक असणारे फायबर यातून मिळावे. थंडीच्या सिझनमध्ये येणाऱ्या प्रत्येक फळभाज्या आणि पालेभाज्या त्यांनी खाव्या. या आहारामुळे त्यांच्या शरिराच्या संतुलित आहाराची गरज पूर्ण होईल.  या शास्त्रीय कारणामुळे या दिवसात 12 भाज्यांचा गरगट्टा केला जातो,' अशी माहिती या विषयातील अभ्यासह आनंद मुस्तारे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना दिली.

'गेल्या 30 वर्षांपासून आम्ही हॉटेल व्यवसायात आहोत. संक्रांतीच्या निमित्ताने नंदीध्वज उचलणाऱ्या सर्व भक्त जणांना हा गरगट्टा यात्रेच्या काळात खायला दिला जातो. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हा गरगट्टा सोलापुरी पद्धतीनेच बनवत आहोत. आमच्या उत्कृष्ट चवीमुळे ग्राहक न चुकता या सीजनमध्ये आमच्याकडे गरगट्टा खायला येतात,' असे सोलापूरच्या हॉटेल अंगराजचे मालक विशाल ठेंगील यांनी सांगितलं.

अधिक माहितीसाठी संपर्क

विशाल ठेंगील - 9049737380

First published:

Tags: Local18, Local18 food, Solapur