जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खराब अक्षराची लाज वाटतीय? अगदी सोप्या पद्धतीनं करा सुधारणा, पाहा Video

खराब अक्षराची लाज वाटतीय? अगदी सोप्या पद्धतीनं करा सुधारणा, पाहा Video

खराब अक्षराची लाज वाटतीय? अगदी सोप्या पद्धतीनं करा सुधारणा, पाहा Video

How to improve handwriting : आपलं अक्षर खराब आहे याची अनेकांना लाज वाटते. सुंदर हस्ताक्षराच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Local18 Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    सोलापूर 31 डिसेंबर : सुंदर अक्षर हाच खरा दागिना हा सुविचार आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हस्ताक्षर चांगलं असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्या अगदी उलट खराब हस्ताक्षरामुळे तुम्हाला अनेकदा चारचौघांमध्ये थट्टा सहन करावी लागली असेल. काही जणांचं शाळेत अक्षर चांगलं असतं.  नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं लॅपटॉप आणि कॉम्पुटरवर काम वाढलं की हस्ताक्षर बिघडतं. या सर्वांसाठी अक्षर चांगले करण्याच्या टिप्स सोलापुरातील अक्षरमित्र अभिजीत भडंगे यांनी सांगितल्या आहेत. कसं सुधारणार हस्ताक्षर? अभिजीत भडंगे हे गेल्या 20 वर्षांपासून सोलापूरमध्ये सुंदर हस्ताराक्षाचे क्लासेस घेत आहेत. त्यांच्या या क्लासचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झालाय. सुंदर हस्तारक्षराची सुटलेली सवयही पुन्हा लावण्याचं काम या क्लासच्या माध्यमातून ते करतात. देवनागरी तसंच इंग्रजी मुळाक्षरे कशी लिहायची याचं मार्गदर्शन ते करतात. ऑनलाईन काम कितीही वाढलं असलं तरी चांगल्या अक्षराचं महत्त्व कायम असेल. ते कधीही संपणार नाही, असं भडंगे यांनी स्पष्ट केलंय. ‘सुंदर हस्ताक्षर असते हे सुंदर आयुष्याचा एक भाग आहे. ज्याचं अक्षर चांगलं त्याचं मनही चांगलं असं म्हणतात.  व्यक्तिमत्व प्रभावी ठरण्यासाठी सुंदर हस्ताक्षर असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करावा,’ असं आवाहन भडंगे यांनी केलं. Video : नाशिककरांसाठी 2023 ठरणार का लकी? रोजगार, पाऊस, पीकपाण्याबद्दल ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य हस्ताक्षर सुधारण्याच्या सोप्या टिप्स - सुरुवातीला शाई पेन किंवा जेल पेन या दोनच पेनचा वापर मुळाक्षरे काढण्यासाठी करावा. - शुद्धलेखनातील आणि देवनागरी मधील सर्व नियम पाळून प्रत्येक मुळाक्षर लिहिण्याचा प्रयत्न करावा. - प्रत्येक शब्दाचे खास महत्त्व असते. ते समजून घ्यावे. उच्चारांचा ओघ आणि हाताचे वळण समान असावे. - प्रत्येक अक्षराची सममिती  कायम राखत दोन्ही बाजूला समान या पद्धतीने प्राथमिक स्वरूपातील सराव करावा. - प्राथमिक स्वरूपाचा सराव हा अत्यंत हळुवारपणे करावा. -  प्रत्येकाच्या पेन पकडण्याच्या पद्धत वेगळी असते. त्याचाही अक्षरावर परिणाम होतो. पॉईंट फिंगर आणि अंगठा यामध्ये पेन पकडण्याची पद्धत ही योग्य आहे. - देवनागरीमधील प्रत्येक अक्षराचा सराव  अधिक केला तर त्यातूनच इंग्रजी हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल. - सण किंवा उत्सव यांच्या शुभेच्छा देताना पत्र लिहून शुभेच्छा द्याव्यात. या उपक्रमातून आपल्याला हस्ताक्षराचा अंदाज येईल. - दररोज किमान एक तास तरी हस्ताक्षराचा सराव करावा.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘आपलं हस्ताक्षरं आणखी सुंदर व्हावं आणि त्यामुळे आयुष्यात आत्मविश्वास वाढावा या हेतूनं हा क्लास जॉईन केला होता. येथील मार्गदर्शनामुळे अक्षरामध्ये फरक पडला आहे. आता घरातील सर्वजण आमच्या अक्षराचं कौतुक करतात. सुंदर हस्ताक्षरामुळे आयुष्यातील सकारात्मकता टिकून राहते,’ अशी भावना गायत्री अघोर आणि अंजली यादव या भडंगे सरांच्या विद्यार्थीनींनी व्यक्त केली आहे.

    गुगल मॅपवरून साभार

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात