मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : श्री काळाराम मंदिर नाव कसे पडले? थेट रामायणाशी आहे संबंध, पाहा VIDEO 

Nashik : श्री काळाराम मंदिर नाव कसे पडले? थेट रामायणाशी आहे संबंध, पाहा VIDEO 

नाशिक मधील श्री काळाराम मंदिर ( Shri Kalaram Mandir In Nashik ) ) शेकडो राम भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे.

नाशिक, 13 सप्टेंबर : पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ( Nashik ) ओळखले जाते. नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. नाशिक नगरीत असलेल्या वेगवेगळ्या मंदिरात रोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.  श्री काळाराम मंदिर ( Shri Kalaram Mandir In Nashik ) ) हे नाशिकमधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. थेट रामायणाशी संबंध असलेल्या या मंदिराचे महत्व, इतिहास आणि वैशिष्टे या विशेष रिपोर्टमधून पाहूया. इथेच प्रभू श्रीरामांनी पर्णकुटी बांधली! श्री काळाराम मंदिर हे खूप प्राचीन आहे. ऐतिहासिक वारसा या मंदिराला आहे. प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास भोगत असताना काही काळ ते पंचवटीतील याच परिसरात वास्तव्यास होते. ज्या जागेवर श्री काळाराम मंदिर आहे याच जागेवर ते पर्णकुटी बांधून दोन वर्षे राहिल्याचे रामायणात उल्लेख असल्याचे अभ्यासक महंत सुधिरदास महाराज सांगतात. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे. हेही वाचा : Nashik : जगातील एकमेव मंदिर, इथं महादेवासमोर नंदी नाही! वाचा काय आहे कारण तब्बल 12 वर्षे सुरू होतं बांधकाम सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर पुर्णतः काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदीराच्या बांधकामासाठी 2 हजार कारागिर 12 वर्षे राबत होते. पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांमध्ये याचा समावेश आहे. 245 फुट लांब व 145 फुट रुंद आहे. मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. काळया पाषाणातील मूर्ती  दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसर अतिशय प्रसन्नमय आहे. मंदिरात प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील 2 फुट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा उत्सव असतो. 14 हजार राक्षसांचा केला होता वध  श्रीरामांनी पंचवटीत शुर्पनखाचे नाक,कान कापल्यानंतर 14 हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले असता. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी  छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केलीआणि सर्व 14 हजार राक्षसांचा वध केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप  प्रभू  श्रीरामांनी धारण केलं होतं. कालस्वरूप म्हणून श्री काळाराम नाव प्रसिद्ध झाले. त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले. हेही वाचा : Beed : यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO मंदिरातील आरतीची वेळ  सकाळी 5 वाजता मंदिर भक्तांसाठी खुलं होतंय. 5:30 वाजता काकड आरती होते. त्यानंतर 11 वाजता मध्यानं पूजा होते. पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आरती होते. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं असते. श्रीरामाची आरती  त्रिभुवनमंडितमाळ गळां। आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण। मारुती सन्मुख उभा कर जोडून॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती। स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी। आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें। आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ कुठे आहे मंदिर ? श्री काळाराम मंदिर हे पंचवटी मध्ये आहे. नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. खाजगी किंवा सरकारी बसने अथवा वाहनाने तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकता.
First published:

Tags: Culture and tradition, Nashik, Temple

पुढील बातम्या