मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रेशीम शेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, एका एकरात कमावतोय तब्बल 6 लाख!

रेशीम शेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, एका एकरात कमावतोय तब्बल 6 लाख!

पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे.

पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे.

पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur, India

  अनुराग सुतकर, प्रतिनिधी

  सोलापूर, 29 मार्च : पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे. मोहोळ तालुक्यातील सौदागर पांडव हे त्यापैकीच एक आहेत. साधारण 10 ते 12 वर्षांपूर्वी पारंपरिक शेती व कृषिपूरक व्यवसायांतून वार्षिक दीड लाख रूपये उत्पन्न घेणारे पांडव आज वार्षिक एकरी 6 ते 7 लाख रुपये रेशीम शेतीमधून सहज मिळवित आहेत.

  मोहोळ तालुक्यातील मौजे पिरटाकळी येथे राहणाऱ्या सौदागर पांडव यांनी बारावीनंतर कृषी पदविकेचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे लागता शेतीची आवड असल्याने वडिलोपार्जित 5 एकर क्षेत्र शेतीमध्ये भरीव उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शेतीचे उत्पन्न वाढण्यासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन दूधव्यवसाय करायला सुरुवात केली. परंतु, दैनंदिन कामे करूनही सहजासहजी उत्पन्नात वाढ होत नव्हती. शाश्वत हमखास उत्पन्नाची हमी नव्हती. त्यामूळे ते चांगल्या शेतीनिगडीत नवीन सुयोग्य शेतीपूरक व्यवसायाच्या शोधात होते

  Success Story : सिताफळाचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यानं शोधला नवा उद्योग,आता करतोय लाखोंची कमाई, Video

  6 ते 7 लाखांपर्यंत पोहचले उत्पन्न

  त्यामुळे त्यांनी सन 2007 मध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी प्रचलित असलेले तुतीवाण एस - 1635 ची 1.00 एकर लागवड ही 3.5 x 1.5 फूट अंतराने केली. लागवडीनंतर बाजूला 20 फूट x 60 फूटचे कीटक संगोपन गृह उभारुन रेशीम शेती करू लागलेत्याकाळी कोषाचे दर कमी असल्याने एकरी प्रती वर्षी एक लक्ष ते दीड लक्ष उत्पन्न मिळायचे. वेळोवेळी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून भेटीदरम्यान होणारे समस्यांचे निराकरण मार्गदर्शन यामुळे आता हेच उत्पन्न एकरी 6 ते 7 लाखांपर्यंत पोहोचले आहे.

   रेशीम शेती करणे सोयीचे

  रेशीम शेतीमध्ये अन्य कृषिपूरक व्यवसायासारखे दैनंदिन कष्ट नसून, महिन्याला एकदाच मार्केटिंग करायचे असते. तसेच, महिन्याला एकदाच कचरा (वेस्टेज) साफसफाई करावयाची असल्याने इतर शेतीची कामे करून रेशीम शेती करणे सोयीचे आहे. शिवाय, कुटुंबातील आई, वडील, एक भाऊ त्यांची धर्मपत्नी यांच्या सहकार्याने काम होत असल्याने बाहेरील मजुरी खर्चाची बचत होते, असं सौदागर पांडव यांनी सांगितले. 

   

   

  First published:
  top videos

   Tags: Agriculture, Local18, Solapur, Success stories