मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी दोन कोटींचं दान, सोन्याचे मुकूट आणि बांगड्या अर्पण

पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी दोन कोटींचं दान, सोन्याचे मुकूट आणि बांगड्या अर्पण

पंढरपूरचा विठुराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे.

पंढरपूरचा विठुराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे.

पंढरपूरचा विठुराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पंढरपूर, 26 जानेवारी : पंढरपूरचा विठुराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक विठुरायाच्या मंदिरात मनोभावे आपापल्या ऐपतीनुसार याठिकाणी दान करत असतात. काही जण पैसे देतात तर काही जण सोन्या चांदीचे दागिने अर्पण करतात. यानंतर आता विठुरायाच्या या खजिन्यात दोन कोटी सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत.

गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिण्यात तब्बल दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. जालना येथील एका भाविकाने हे गुप्त दान विठुरायाच्या चरणी अर्पण केले आहे.

गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठे विठुरायाच्या चरणी दान अर्पण झाले आहे. आज विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जालन्याचा एका भाविकाने सुमारे दोन कोटी रूपयांच्या सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या असे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केले आहे.

याबरोबरच विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे रुखवत देखील भेट देण्यात आले आहेत. या भाविकाने आज विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाख देखील भेट दिला आहे. हे सर्व दागिने आज मंदिर समितीकडे सुपूर्त करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा - प्रजासत्ताक दिनी करा हे 5 तिरंगी पदार्थ, सहज तयार होतील आणि उत्सवाचा आनंद वाढवतील

दरम्यान, आज 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल आणि रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

First published:

Tags: Pandharpur, Pandharpur (City/Town/Village), Viththal, Vitthal mandir pandharpur