Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जन्मापासून पायच बनलेत 'हात'! नंदुरबारच्या 8 वर्षीय गणेशच्या जिद्दीची कहाणी

जन्मापासून पायच बनलेत 'हात'! नंदुरबारच्या 8 वर्षीय गणेशच्या जिद्दीची कहाणी

जन्मापासून पायच बनलेत 'हात'!

जन्मापासून पायच बनलेत 'हात'!

शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणाऱ्या गणेश माळी या 8 वर्षीय मुलाची कहाणी सध्या अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नंदुरबार, 25 जानेवारी : दोन्ही हाताने व्यंग, अशातच घरची हालाकीची परिस्थीती, त्यातही अवघ्या आठ वर्षांच्या कोवळ्या वयात आई घर सोडुन गेली. तरीही या विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला एक गणेश आपल्या व्यंगत्वावर मात करत आयुष्याचा लढा देत आहे. त्याच्या जगण्याच्या जिद्दीची ही कहाणी. शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणाऱ्या गणेश माळी या 8 वर्षीय मुलाची कहाणी सध्या अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे.

आठ वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात असा कोणता मोठा संघर्ष असेल? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर थांबा. कारण, गणेशचा संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गणेश आनंद माळी हा दुसरीत शिकतो. मात्र, त्याला जन्मापासुन दोन्ही हातच नाही. तरी त्याची जगण्यासोबतची लढाई काही कमी झालेली नाही. त्याला हात नसताना देखील त्याने वयाच्या अवघ्या आठ वर्षात आपल्या अंपगत्वावार मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्या भल्यांना अचंबित करणारी आहे. काही कौटुंबिक कारणास्तव तो लहान असतानाच आई घर सोडुन गेली. अशात गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याचे वडीलच सांभाळत आहे. सकाळी चार वाजता उठुन त्याचे वडील त्याच्या नित्यचर्येसाठी त्याल मदत करतात.

गणेश माळीची अपंगत्वावर मात

विशेष म्हणजे गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवण्याच काम करत आहे. पायाने लिखाणासोबतच तो अनेक गोष्टी सराईतपणे करतो. जेवणाचा प्रश्न म्हणाल तर पायच हाताचं काम करतात. वर्गातील मित्रही त्याला अभ्यासात सहकार्य करतात. या कोवळ्या वयातही त्याची शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याच अपंगत्व थांबवु शकलेलं नाही. शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील चपळता भल्या भल्यांना आवाक करणारी आहे. पण घराच्या गरीबीमुळे तो आणखीन किती तग धरणार हा प्रश्न त्याच्या शिक्षकांसह गावातील त्यांच्या शुभचिंतकांनाही भेडसावत आहे. वडील मोल मजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजारा करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रीम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मतदीची अपेक्षा त्यांचे जवळचे मंडळई करत आहे.

बुद्धी आणि जिद्दीचा धनी असलेल्या गणेशची आर्थिक झोळी खाली असली तरी त्याचा जगण्याचा हा संघर्ष अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. चिमुकल्या वयात मायेची ममता मुकलेल्या या गणेशला आता आपल्या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे मायबाप सरकारने पुढे येवुन त्याच्यासाठी कृत्रीम अवयवांचा बंदोबस्त करुन दिला. शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिलं तर हा गणेश आगामी काळात इतरांसांठी प्रेरणादायी लढाच ठरेल.

First published: