मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आषाढीची तहान कार्तिकीवर, साडेचार वर्ष अन् दोन संधी हुकल्यावर फडणवीस विठुरायाचरणी पुन्हा आले!

आषाढीची तहान कार्तिकीवर, साडेचार वर्ष अन् दोन संधी हुकल्यावर फडणवीस विठुरायाचरणी पुन्हा आले!

साडेचार वर्ष आणि हुकलेल्या दोन संधींनंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये विठुरायच्या शासकीय पुजेचा मान मिळाला आहे.

साडेचार वर्ष आणि हुकलेल्या दोन संधींनंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये विठुरायच्या शासकीय पुजेचा मान मिळाला आहे.

साडेचार वर्ष आणि हुकलेल्या दोन संधींनंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये विठुरायच्या शासकीय पुजेचा मान मिळाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India

पंढरपूर, 3 नोव्हेंबर : साडेचार वर्ष आणि हुकलेल्या दोन संधींनंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये विठुरायच्या शासकीय पुजेचा मान मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूरमध्ये आले आहेत. शुक्रवारी पहाटे देवेंद्र फडणवीस पत्नीसह विठुरायाची पूजा करणार आहेत.

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले आणि वारकऱ्यांबरोबर ग्यानबा-तुकारामचा तालही धरला.

हुकलेल्या संधी

2014 ला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विठोबाची शासकीय महापूजा पहिल्यांदा 2015 साली केली. पण 2018 साली मराठा आरक्षणाच्या मोर्चाचं वादळ महाराष्ट्रभर घोंघावत होतं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता, यानंतर फडणवीस यांनी आषाढी एकादशीची पूजा न करण्याचा निर्णय घेतला होता.

'पोलिसांनी काही मेसेज ट्रेस केले आहेत, त्यानुसार वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरीचे प्रयत्न केले जाऊ शकतात. मला झेड सिक्युरिटी आहे, पण लाखो भाविकांचं काय, त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मी महापुजेला जाणार नाही,' असं फडणवीस म्हणाले होते.

2018 साली झालेला हा वाद शांत झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या आषाढी एकादशीला सपत्नीक विठुरायची महापूजा केली, यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर महाविकासआघाडीचा प्रयोग झाला अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून 2020 आणि 2021 च्या आषाढी एकादशीचा महापुजेचा मान मिळाला.

2022 ची संधीही हुकली

2022 च्या आषाढी एकादशीच्या तोंडावर महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं, यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आषाढीची महापूजा करतील, अशी शक्यता निर्माण झाली, पण भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे आषाढीच्या महापुजेचा मान एकनाथ शिंदेंना मिळाला, तर उपमुख्यमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आता कार्तिकी एकादशीची पूजा करण्यासाठी पंढरपुरात आले आहेत.

First published:

Tags: Devendra Fadnavis