मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धेचं आयोजन, वाचा कशा पद्धतीनं होता येईल सहभागी

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धेचं आयोजन, वाचा कशा पद्धतीनं होता येईल सहभागी

रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी काय आहेत जाणून घ्या.

रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी काय आहेत जाणून घ्या.

रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी काय आहेत जाणून घ्या.

 • Local18
 • Last Updated :
 • Solapur [Sholapur], India

  सोलापूर, 27 डिसेंबर : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही रब्बी हंगामासाठी खास ही स्पर्धा घेण्यात येत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

  काय असतील नियम अटी ?

  रब्बी हंगामासाठी स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस अशी एकूण 05 पिके समाविष्ट आहेतपिक स्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावेतथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1 हजार हेक्टर पेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. तालुकास्तरावर स्पर्धेक संख्या सर्वसाधारण गटासाठी किमान 10 अदिवासी गटासाठी किमान 05 असावीपिक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली (भात)किमान 20 आर इतर पिकांसाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

  Beed : नव्या वर्षापूर्वी शेतकरी अडचणीत, पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना!

  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिक निहाय 300 रुपये आहेरब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येणार आहेतालुकास्तर, जिल्हास्तर राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल-प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. मागील वर्षाच्या तालुकास्तरीय स्पर्धेतील पिकनिहाय पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या शेतक-यांनी जिल्हास्तरीय पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. 

  असं राहणार बक्षिसचे स्वरूप 

  जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे बक्षीस 7 हजार रुपये तिसरे बक्षीस 5 हजार रुपये असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रुपये 50 हजार रुपये दुसरे बक्षीस 40 हजार रुपये, तिसरे बक्षीस 30 हजार रुपये असणार आहे.

  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Local18, Solapur