अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 12 एप्रिल : शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा आता संपलीय. या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. इंजिनिअर किंवा डॉक्टरच नाही तर अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत. कायदा हे त्यापैकी एक महत्त्वाचं क्षेत्र आहेत. बदलत्या काळात वकिल म्हणजे केवळ काळा कोट घालून कोर्टात युक्तीवाद करणारा मर्यादीत राहिलेला नाही. तर सरकारी आणि खासगी क्षेत्रातही कायदेशीर सल्ला देण्यासाठी त्यांची गरज वाढली आहे. बीई आव्हाड क्लाससचे गणेश शिरसाट सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बारावीनंतर कायदा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केलं आहे. गणेश शिरसाट यांनी आजवर 650 पेक्षा अधिक प्रथम श्रेणीतील न्यायाधीश तसेच वकिली क्षेत्रातील अनेक मोठे अधिकारी आपल्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहेत. ‘वकिलीच्या क्षेत्रामध्ये वडिलोपार्जित वारसा असेल तरच टिकून राहता येतं ही कल्पना चुकीची आहे. तुम्ही नव्या संधी शोधत राहा. त्यावर मन लावून काम करा, असा सल्ला मी नवोदित वकिलांना देतो,’ असं शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काय आहेत संधी? - बारावीनंतर पाच वर्ष लाँच पदवी घेतल्यानंतर वैयक्तिक प्रॅक्टिस करू शकता. - न्यायव्यवस्थेसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून न्यायाधीश या पदासाठी परीक्षा देऊ शकता. - शिवाय सरकारी वकील किंवा असिस्टंट पब्लिक प्रोस्टीक्युटर ही परीक्षा देऊ शकता. ही परीक्षा देण्यासाठी वकिलीचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. - सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणजेच असिस्टंट चॅरिटी कमिशनर ही महत्त्वाची परीक्षा देखील देता येऊ शकते. या परीक्षेसाठी चार वर्षांचा वकिलीचा अनुभव आवश्यक आहे. शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video - मंत्रालयामध्ये सुद्धा लीगल ॲडव्हायझर म्हणून परीक्षा देऊन ती नोकरी मिळवता येते. - खाजगी क्षेत्रामध्ये कार्पोरेट बँक किंवा इतर कोणत्याही कार्यालयामध्ये कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला मिळू शकते, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.