साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया हा मुहूर्त शनिवारी आहे. या दिवशी अनेकांच्या घरी आमरसाचा बेत असतो.
सोलापूरकरांचाही अक्षयतृतीयेला आंबे खाण्याचा बेत आहे. पण,त्यांना निराशा सहन करावी लागणार आहे.
सोलापुरात प्रसिद्ध असणारे तोतापुरी , तसेरी, पायरी ,लंगडा, चौसा, सफेदा ,मलेगा हे आंब्याचे प्रकार हे अक्षय्य तृतीया झाल्यानंतर पंधरा दिवसांनी येण्याची अपेक्षा आहे.
अक्षय्य तृतीयेला हे आंबे मिळणार नसल्यानं सोलापूरकरांमध्ये नाराजी आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहतुकीच्या दरात यंदा वाढ झाली असली तरी आंब्याचे दर स्थिर आहेत, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती मधील आंबे व्यापारी जाकीर बागवान यांनी दिलीय.
आंबे विक्रीची सोलापुरातील मुख्य बाजारपेठ म्हणून लक्ष्मी मार्केट येथील बाजारपेठ ओळखली जाते सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या या बाजारात होलसेल दरात आंब्यांची खरेदी करता येते.
छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, एसटी स्टँड परिसर आणि कस्तुरबा मंडईमध्येही सोलापूरकरांना आंबे खरेदी करता येतील.