अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 07 फेब्रुवारी : सोलापूर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रशासनाच्या वतीने शहरात प्रथमच वृक्ष गणना मोहीम सुरू करण्यात आली आहे. एप्रिल 2022 पासून ही वृक्ष गणना सुरू झाली असून जवळपास एक वर्षाचा कालावधी यासाठी देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या वतीने प्रभाग न्याय सुरू असलेल्या या वृक्ष गणना मोहिमेत 10 महिन्यात जवळपास 85 टक्के वृक्ष गणना पूर्ण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 85 हजार झाडांना जिओ टॅग लावून त्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
काय आहे प्लॅन?
शहरात आणि हद्दवाढ परिसरात तुलनेने वृक्षांची संख्या ही फारच कमी आहे. काही ठिकाणी हद्दवाढ भागात वृक्षांची संख्या जास्त आहे तर शहर आणि गावठाण परिसर हा त्यामानाने फारच बकाल अवस्थेत आहे. शिवाय शहरातील हरित पट्टा कमी आणि हद्दवाढ भागात शेतीपट्टा अधिक असल्याने दोन्ही समतोल राखण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा आणि त्यातूनच पर्यावरण ॲक्शन प्लॅन तयार करून धुळीची समस्या नाहीशी करण्यात यावी यावर प्रशासनाचा अधिक भर असल्याचे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.
Solapur : मॅनेजर असावा तर असा! गरीब कुटुंबाला मिळवून दिली माहिती नसलेली हक्काची रक्कम, Video
ही झाडे लावण्याची आवश्यकता
पक्षांकरिता निवासस्थान आणि सोलापूरच्या वातावरणाकरता पांगरा, पळस , आंबा, सिताफळ, रामफळ, जायफळ, चाफा, हिरवा चाफा यांसारख्या वनस्पतींची जर आपण लागवड केली तर येत्या 10 वर्षात नक्कीच धुळीची समस्या नाहीशी होईल. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच वाढणारी झाडे जर लावली तर अति उंचावर जाणारी धूळ ती झाडे सामावून घेतील आणि खालचा परिसर मुक्त राहील, अशी माहिती जीवशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक जयराम भिडे यांनी दिली आहे.
काय सांगते आकडेवारी ?
-शहरात 165 प्रकारची देशी झाडे तर 132 प्रकारची विदेशी झाडे आहेत.
-शहरात सुबाभूळ, कडुलिंब या झाडांची संख्या जवळपास 85 हजार इतकी आहे.
-नारळ, सिताफळ, दामास्ट्री या झाडांची संख्या जवळपास 26 हजार इतकी आहे.
- आंबा, हिवर, अशोका, सातपर्णी आणि विलायती बाभूळ यांची संख्या जवळपास 20 ते 22 हजार इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.