सोलापूर, 07 सप्टेंबर : सोलापूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात एका महिलेचा जीव गेला असता. (Solapur Railway Station) 21 वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने ती रेल्वे आणि फलट्याच्या मध्ये अडकून खाली जात होती. तेवढ्यातच फलाटावर कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास ही बाब लक्षात येताच. अत्यंत तातडीने त्याने पळत जात त्या महिलेला खाली जाताना पकडून बाहेर काढले. ही घटना सोलापूर रेल्वे स्थानकावर फलक क्रमांक 4 वर घडली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अदिती महेश पांढरे, (वय २१ वर्षे, रा. श्रेयश अपार्टमेंट,दर्बी कलेक्शन,सात रास्ता) सोलापूर ही युवती सोलापूरहून जाण्यासाठी स्थानकावर आली होती. फलट क्रमांक 4 गाडी क्रमांक ११०१३ लोकमान्य टिळक-कोईमतूर एक्सप्रेस आली आणि काही सेकंद थांबून पुन्हा कोईमतूरकडे जाण्यासाठी निघाली. दरम्यान अदिती पांढरे ही रेल्वे गाडी चढत असतानाच तिचा पाय घसरला आणि ती फलाट व रेल्वेमधील अंतर असलेल्या गॅपमध्ये फसली.
सोलापूर : धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात तरुणीचा पाय घसरून पडली प्लँटफॉर्मवर, रेल्वे सुरक्षा रक्षकानी तरुणीचा जीव वाचवला. pic.twitter.com/LWnYoq6be0
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) September 7, 2022
हे ही वाचा : वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी! एअरबॅगसह या चार गोष्टी सरकार अनिवार्य करणार
ही बाब कर्तव्यावर असलेल्या आरक्षक एएसआय सतीश पोटभरे व पी. एस. सी. त्रिपाठी यांना दिसली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तात्काळ प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेत जीव वाचविला.आरक्षकाच्या धाडसाचे फलाटावरील सर्वांनी कौतुक केले.जवानाने जीव वाचवल्यामुळे प्रवाशाने जवानाचे आभार मानले.
दरम्यान धावत्या रेल्वेत प्रवाशांनी जीव धोक्यात घालून चढू नये अथवा उतरू नये. त्यामुळे गाडी थांबल्यानंतर चढावे अथवा उतरावे जेणेकरून स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे .जीव धोक्यात घालून गाडीमध्ये चढत असलेल्या तरुणीचा आरपीएफ जवानांनी जीव वाचवला आहे. असे रेल्वे व्यवस्थापक अधिकारी म्हणाले.
हे ही वाचा : Post Office Scheme: ‘या’ सरकारी योजनेत दरवर्षी मिळतील 1.11 लाख रुपये, 5 वर्षानंतर संपूर्ण गुंतवणूकही परत
मागच्या तीन दिवसांपूर्वी रेल्वेचा सोलापूर जिल्ह्यात मोठा अपघात
सोलापूरच्या करमाळ्यात एका मालगाडीचा अपघात झाला. मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालगाडीचं नुकसान झालं. मालगाडीचे डबेही रेल्वे रुळावरुन घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला होता. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसल्याचे पाहायला मिळाले. केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले.